गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरांचे ‘Bappa.org’ वर डिजिटल दस्तऐवजीकरण करा- जिल्हाधिकारी, आंचल गोयल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, September 24, 2026

गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरांचे ‘Bappa.org’ वर डिजिटल दस्तऐवजीकरण करा- जिल्हाधिकारी, आंचल गोयल

 

गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक परंपरांचे ‘Bappa.org’ वर डिजिटल दस्तऐवजीकरण करा- जिल्हाधिकारी, आंचल गोयल




मुंबई(कटूसत्य वृत्त):-  गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मुंबई शहर जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या माध्यमातून जपल्या जाणाऱ्या विविध परंपरांचे डिजिटल स्वरूपात दस्तऐवजीकरण करून हा समृद्ध वारसा भावी पिढ्यांसाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘Bappa.org’ या डिजिटल व्यासपीठाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी, मुंबई शहर, आंचल गोयल यांनी केले आहे.

या उपक्रमांतर्गत मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या घरगुती तसेच परिसरातील गणेशोत्सवाशी संबंधित छायाचित्रे, व्हिडिओ, आरती, पारंपरिक पूजा-विधी, नैवेद्य, पारंपरिक पाककृती, गणेशमूर्ती निर्मिती, सजावट, भजन-कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कुटुंब आणि स्थानिक पातळीवर जपल्या जाणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरांची नोंद ‘Bappa.org’ या डिजिटल व्यासपीठावर करावी.

गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक ऐक्य, सांस्कृतिक वैविध्य आणि स्थानिक परंपरांच्या संवर्धनाचा उत्सव आहे. मुंबई शहरातील विविध कुटुंबे, संस्था आणि परिसरांमध्ये प्रचलित असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, पूजा-पद्धती, खाद्यसंस्कृती आणि सांस्कृतिक उपक्रमांचे दस्तऐवजीकरण झाल्यास मुंबईच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे व्यापक स्वरूप अधोरेखित होण्यास मदत होणार आहे.

‘Bappa.org’ या डिजिटल माध्यमातून नोंदविण्यात येणाऱ्या माहितीचा उपयोग पारंपरिक व सांस्कृतिक वारशाचे जतन, दस्तऐवजीकरण आणि भावी पिढ्यांपर्यंत त्याचे संक्रमण करण्यासाठी करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित माहिती, छायाचित्रे आणि व्हिडिओ निर्धारित पद्धतीने या डिजिटल व्यासपीठावर नोंदवावेत.

या उपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना ‘Digital Culture Register Certificate’ देऊन त्यांच्या सहभागाची नोंद करण्यात येणार आहे. आपल्या कुटुंबाची तसेच परिसराची सांस्कृतिक परंपरा डिजिटल स्वरूपात जतन करण्याची ही महत्त्वपूर्ण संधी असल्याचेही जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी नमूद केले.

मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या गणेशोत्सवाशी संबंधित परंपरा, प्रथा आणि सांस्कृतिक वारशाची नोंद ‘Bappa.org’ या डिजिटल व्यासपीठावर करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages