अनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 12, 2026

अनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन

 अनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन



 

अनगर (कटूसत्य वृत्त):- शासनाच्या विविध योजना व त्याचा लाभ मिळवण्यासाठी  लागणारी कागदपत्रे व दाखले हे गावातच उपलब्ध व्हावेत यासाठी महसूल विभागाच्या वतीने अनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्याचे उद्घाटन मोहोळचे तहसीलदार सचिन मुळीक यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. प्रमुख पाहुणे म्हणून लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील उपस्थित होते. 
यावेळी पंचायत समिती सदस्य संजीव दादा खिलारे,उपनगराध्यक्ष श्रीकांत घाटोळे, नगरसेवक नारायण गुंड, श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत ढोले, उपप्राचार्य माधव खरात अनगरचे मंडल अधिकारी बालाजी नागटिळक आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 
यावेळी तहसीलदार सचिन मुळीक यांनी या शिबिराचा हेतू स्पष्ट करून यात कोणकोणते दाखले व कागदपत्रे मिळतील याची माहिती दिली. 
लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी महसूल विभागाच्या वतीने गावातच दाखले उपलब्ध करून दिल्याबद्दल तहसीलदार सचिन मुळीक यांचे आभार मानले. या शिबिरात अन्नसुरक्षा लाभार्थी रेशन कार्डचे वाटप,  संजय गांधी निराधार योजना लाभार्थींना मंजुरी पत्रे वाटप व श्रावण बाळ निराधार योजना लाभार्थी यांना शिबिरात पत्राचे प्रातिनिधिक स्वरुपात वाटप करण्यात आले. 
या शिबिरात महसूल विभाग, आरोग्य विभाग, बचत गट, अंगणवाडी सेविका, कृषी विभाग,पुरवठा विभाग, नगरपंचायत विभाग,शिक्षणविभागआदी विभागाने सक्रिय सहभाग घेतला.
या शिबिरात खालील दाखले व कागदपत्रे  काढण्यासाठीचे शिबिर घेण्यात आले 
 प्रलंबित फेरफार, सातबारा मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीने सातबारा आणि आठ अ उताराचे वाटप,  उत्पन्नाचा दाखला, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र, अकृषिक परवानगी, अकृषिक तरतुदी बाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसाह्य योजनांचे लाभ मंजूर, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी लाभाच्या उल्लंगणाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा, घरासाठी पट्टेवाटप, ई मोजणी अर्ज व पी एम किसान नोंदणी, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करणे व गाव दप्तर अद्यावत बाबत, दिव्यांग प्रमाणपत्र व आधार कार्ड संलग्न करणे, आरोग्य विभागाच्या वतीने नेत्र तपासणी, आयुष्यमान भारत आधी दाखले व कागदपत्रे ची पूर्वतयारी करण्यात आली.

हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महसूल विभागाचे मंडल अधिकारी बालाजी नागटिळक, ग्राम महसूल अधिकारी महसूल अधिकारी सुदर्शन जाधव, नंदकिशोर दांडगे, हरिदास ताले'नुतन गोडसे,सुभाष घाडगे,बापु उघडे,बाळू मोरे आदि आधिकारी व कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages