सिंहगड केगाव कॅम्पसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 20, 2026

सिंहगड केगाव कॅम्पसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

सिंहगड केगाव कॅम्पसमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी




 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव येथे दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरी करण्यात आली.

सिंहगड पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळचे सहसचिव व सिंहगड इन्स्टिट्यूट केगाव, सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर  संजय नवले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

यावेळी शाळेच्या प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या शौर्य, धैर्य, पराक्रम व आदर्श राज्यकारभाराचा गौरव केला. याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना  संजय नवले सर म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार व कार्य आजच्या पिढीसाठी सदैव प्रेरणादायी असून त्यांच्या आदर्शांवर चालणे हीच त्यांना खरी मानवंदना आहे.”

याच अनुषंगाने एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास माजी कुलगुरू तथा सिंहगड सीआरटीडीचे संशोधन संचालक प्रा. एस. एच. पवार, सिंहगडचे प्राचार्य डॉ. शंकर नवले, प्रा. माणिक शिंदे, ग्रंथपाल जी. एस. गोघले, विद्यानंद बाबर यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
दोन्ही संस्थांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर करत त्यांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचा संकल्प करण्यात आला.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages