सहकार महर्षि साखर कारखान्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 20, 2026

सहकार महर्षि साखर कारखान्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

सहकार महर्षि साखर कारखान्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती  साजरी



अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक 'श्री छत्रपती शिवाजी महाराज" यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त गुरूवार दिनांक १९/०२/२०२६ रोजी सकाळी ८:३० वाजता श्री शिवपार्वती देवालय, शंकरनगर येथील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधिवत पूजन करून पुष्पहार अर्पण करणेचा सोहळा कारखान्याच्या संचालिका कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील व सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील, संचालक तथा नगरसेवक, अकलूज नगरपरिषद, अकलूज यांचे शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सहकार महर्षि कारखान्याचे मार्गदर्शक संचालक विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील, माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच कारखान्याचे चेअरमन  जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांचे नेतृत्वाखाली दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचे जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

सदर कार्यक्रमास कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने-देशमुख, संचालक लक्ष्मण शिंदे,विराज निंबाळकर,रामचंद्र ठवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक पांडूरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, दत्तात्रय चव्हाण,धनंजय सावंत, नामदेव चव्हाण,धनंजय दुपडे,अनिलराव कोकाटे, सौ. हर्षाली निंबाळकर, माजी संचालक भिमराव काळे,भारत फुले,शिवाजीराव सिद, बाळासाहेब पवार,मोहनराव लोंढे,धनंजय चव्हाण तसेच कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले व खातेप्रमुख, अधिकारी, पत्रकार, कार्यलक्षी संचालक, जयवंत माने-देशमुख तसेच सर्व कामगार व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages