प्रशासकीय इमारतीत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 20, 2026

प्रशासकीय इमारतीत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन

 प्रशासकीय इमारतीत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त अभिवादन




सोलापूर(कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या शिवजन्मोत्सव मंडळ, सर्व अधिकारी व कर्मचारी वृंद यांच्या वतीने प्रशासकीय इमारतीत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संपूर्ण परिसरात शिवमय वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरी ताई देवकर, शिवव्याख्याते शिवरत्न शेटे, सभागृह नेते नरेंद्र काळे, गटनेते अमोल बापू शिंदे, मध्यवर्ती अध्यक्ष अर्जुन सलगर, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, नगरसेवक विनोद भोसले, नगरसेवक बिज्जू प्रधाने, नगरसेवक गौतम कसबे, नगरसेविका चाकोते, नगरसेवक अजय पोंनम, नगरसेवक सत्यनारायण गुर्रम, नगरसेवक व्यंकटेश कोंडी, मनीष केत यांच्यासह
शिवजन्मोत्सव संस्थापक अध्यक्ष माऊली पवार, शिवजन्मोत्सव समितीचे २०२६ चे अध्यक्ष प्रभुलिंग पुजारी, मेघराज साळुंखे, सोहन माने, सौरभ सांगवे, देविदास मोहिते, श्रीनिवास रामगल, भारत रोडगे, युवराज गाडेकर, दिलीप देशमुख, श्रीकांत घोलप, अमृत हावळे तसेच इतर सदस्य व अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवव्याख्याते शिवरत्न शेटे यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याविषयी, स्वराज्य स्थापनेतील त्यांचे अद्वितीय योगदान, शौर्य, दूरदृष्टी आणि आदर्श शासनव्यवस्था याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी महाराजांचे विचार आत्मसात करून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते पारंपरिक लेझीम खेळाचे उद्घाटन करण्यात आले. लेझीमच्या तालावर वातावरण दणाणून गेले आणि उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages