अनगर प्रशालेत शिवजयंती व लोकनेते बाबुराव अण्णा पाटील पुण्यतिथी साजरी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 20, 2026

अनगर प्रशालेत शिवजयंती व लोकनेते बाबुराव अण्णा पाटील पुण्यतिथी साजरी

 अनगर प्रशालेत शिवजयंती व लोकनेते बाबुराव अण्णा पाटील पुण्यतिथी साजरी




अनगर (कटूसत्य वृत्त):- अनगर येथील कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात शिवजयंती, लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांची पुण्यतिथी, व विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजश्री राजन पाटील या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध वक्ते महादेव माने होते.
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज व लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्राचार्य महादेव चोपडे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित केले.
यावेळी बोलताना माने म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे लोकोत्तर पुरुष होते सर्वसामान्य कष्टकऱ्या लोकांसाठी त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि लोकांच्या मनात स्वाभिमान जागृत केला तेच काम स्वर्गीय लोकनेते बाबुराव अण्णा पाटील यांनी अनगर परिसरामध्ये केले
यावेळी नूतन नगराध्यक्ष व नूतन नगरसेवक यांचा सन्मान करण्यात आला.
 विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार, कलाश्री पुरस्कार, क्रीडा निपुण, पुरस्कार स्कॉलर पुरस्कार, बेस्ट कॅडेट्स पुरस्कार,विज्ञान प्राविण्य पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपनगराध्यक्ष श्रीकांत घाटुळे, नारायण गुंड, सारंग गुंड, विठ्ठल कारंडे, विशाल थिटे, रूपाली शिंदे, सीमा गुंड, शीतल गायकवाड,सुरेखा डिकोळे काजल मोरे' वैशाली पाचपुंड, विजया कोकरे व एडवोकेट रवींद्र पाटील या नूतन नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्था संचालक भागवत शिंदे, मधुकर मारडकर, दत्तात्रय थिटे, किरण गुंड, संस्थेचे मुख्य कार्य अधिकारी चंद्रकांत ढोले, उप मुख्याध्यापक माधव खरात पर्यवेक्षक राजेंद्र डोके आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते सत्यवान दाढे यांनी सूत्रसंचालन केले तर राजेंद्र डोके यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages