३५ हजार मीटरच्या दोऱ्याच्या माध्यमातून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 20, 2026

३५ हजार मीटरच्या दोऱ्याच्या माध्यमातून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा

 ३५ हजार मीटरच्या दोऱ्याच्या माध्यमातून साकारली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सोलापूर शहरात उत्साहाचे वातावरण असताना एका आगळ्या वेगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आकर्षक प्रतिमेने सोलापूरकरांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे.

सोलापूर येथील एका प्रतिभावान चित्रकार विपुल मिरजकर याने तब्बल २२ बाय २२ फुटांची भव्य प्रतिमा केवळ दोऱ्याच्या सहाय्याने साकारली आहे.

दरम्यान, ही कलाकृती पूर्ण करण्यासाठी जवळपास ८ ते १० दिवसांचा कालावधी लागला आहे. त्यांना पाच सहकाऱ्यांची साथ लाभली असून पारंपरिक चित्रकलेपेक्षा वेगळा प्रयोग करण्याचा उद्देश होता आणि शिवप्रेमींसाठी ही कलाकृती अर्पण करण्यात आल्याचे चित्रकार विपुल मिरजकर यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मित्र मंडळ आणि सुभाष गुरुजी पवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही भव्य प्रतिमा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आली आहे. त्यामुळे चौकात येणाऱ्या नागरिकांचे आणि शिवप्रेमींचे लक्ष वेधले जात असून अनेकजण या कलाकृतीसोबत छायाचित्रेही काढत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages