श्रीकृष्ण देवस्थानतर्फे मूर्ती पुनर्प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 20, 2026

श्रीकृष्ण देवस्थानतर्फे मूर्ती पुनर्प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम

 श्रीकृष्ण देवस्थानतर्फे मूर्ती पुनर्प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जुना विडी घरकुल, सागर चौक येथील श्रीकृष्ण देवस्थानतर्फे मूर्ती पुनर्प्राणप्रतिष्ठापना, सुवर्णकळसारोहण यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन 22 ते 28 फेब्रुवारी या दरम्यान करण्यात आली आहे अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष विठ्ठलदास गज्जम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
             यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 22 ते 28 फेब्रुवारीपर्यंत दररोज  सायंकाळी 6.30 ते रात्री 8.30  या वेळेत परमपुज्य श्री श्री श्री पराविद्या नंदगिरी माता व गोपालकृष्णागारू ब्रम्हचारी यांचे "श्रीमद् भागवतम्" या विषयावर तेलुगू प्रवचन होणार आहे. गुरुवार २६ फेब्रुवारी रोजी नवीन श्रीकृष्णसह विविध देव देवतांच्या मूर्तींची पुनर्प्राणप्रतिष्ठापना व सुवर्ण कळसारोहण कार्यक्रम होणार आहे. शनिवार २८ फेब्रुवारी रोजी श्रीकृष्ण रुक्मिणीदेवी कल्याणोत्सवम् होईल.
दररोज पहाटे ह.भ.प. राकेश अन्नम महाराज व मार्कंडेय दिंडी संस्था यांच्या नेतृत्वाखाली काकडाआरती, सकाळी  ह.भ.प. श्रीनिवास द्यावनपल्ली महाराज यांच्या नेतृत्वाखाली श्रीमद्भगवद्‌गीता पारायण,  पंडित श्रीविष्णुसुदर्शना जिल्ला गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम होणार आहे.
रविवार, दि. 22 फेब्रुवारी दुपारी 12 वाजता  सर्व मूर्तींची मिरवणूक काढण्यात येणार आहे.  
गुरुवार, दि. 26 फेब्रुवारी रोजी दुपारी 11.58 वाजता परमपुज्य श्री श्री श्री संपूर्णानंदगिरी स्वामी यांच्या
हस्ते मुर्ती पुनर्प्राणप्रतिष्ठापना व सुवर्ण कळसारोहण कार्यक्रम  होणार आहे. शुक्रवार, दि. 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता जलकलश व कळशाभिषेक मिरवणूक निघणार आहे.
शनिवार, दि. 28 फेब्रुवारी रोजी श्रीकृष्ण रुक्मिणीदेवी कल्याणोत्सवम् कार्यक्रम दुपारी 12 वाजता होणार आहे. यानिमित्त पहाटे  सुप्रभातम् सेवा, श्रीवारी महाभिषेकम्, अलंकार व शृंगार दर्शन कार्यक्रम होणार आहे. सकाळी 9 वाजता प्रतानम होणार आहे. त्यानंतर दुपारी महाप्रसाद होणार आहे. या कार्यक्रमास भक्तगणांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीकृष्ण देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
          या पत्रकार परिषदेला मंदिराचे उपाध्यक्ष भास्कर बल्ला, दत्तात्रय बिज्जा, श्रीनिवास अन्नम, गिरीश गोसकी आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages