सोलापूरच्या औद्योगिक प्रगतीसाठी समन्वयाची गरज- महापौर विनायक कोंड्याल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, February 26, 2026

सोलापूरच्या औद्योगिक प्रगतीसाठी समन्वयाची गरज- महापौर विनायक कोंड्याल

 सोलापूरच्या औद्योगिक प्रगतीसाठी समन्वयाची गरज- महापौर विनायक कोंड्याल





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका चे नूतन महापौर विनायक कोंड्याल यांची आज प्रिसीजन कंपनीचे चेअरमन तथा व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा यांनी महापौर कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी शहा यांनी पुष्पगुच्छ देऊन महापौरांना नव्या पदभाराबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या भेटीत सोलापूर शहराच्या औद्योगिक विकासाला गती देणे, नव्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे, स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती वाढविणे तसेच पायाभूत सुविधांचे बळकटीकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सोलापूर शहर औद्योगिकदृष्ट्या अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक बनवण्यासाठी उद्योग क्षेत्र व महानगरपालिका यांच्यात प्रभावी समन्वय आणि सहकार्य आवश्यक असल्याचे मत दोन्ही मान्यवरांनी व्यक्त केले.
महापौर कोंड्याल यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योग क्षेत्राने सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. स्वच्छता अभियान, पाणीपुरवठा व्यवस्था, रस्ते विकास आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या मूलभूत विषयांमध्ये उद्योग क्षेत्राचे सहकार्य महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी यतीन शहा यांनी सोलापूर महानगरपालिकेसोबत सकारात्मक व सक्रिय सहकार्य ठेवून शहराच्या प्रगतीसाठी आवश्यक ते योगदान देण्याची ग्वाही दिली. या भेटीमुळे सोलापूरच्या औद्योगिक आणि नागरी विकासाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages