Hot Posts

6/recent/ticker-posts

एस.व्ही.सी.एस. प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

 एस.व्ही.सी.एस. प्रशालेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 



 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एस.व्ही. सी. एस. हायस्कूल एमआयडीसी येथे भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमा पूजनानंतर संस्थेचे संचालक शशिकांत रामपुरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर उत्कृष्ट खडे व बैठे कवायत प्रकार सादर केले. प्राथमिक, माध्यमिक व इंग्लिश मीडियम मधील विद्यार्थ्यांचे भाषणे झाली यावेळी बोलताना मुख्याध्यापक म्हमाणे म्हणाले, संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्ष, लोकशाही या तरतुदींचा प्रत्येक भारतीयांनी तंतोतंत आचरण केल्यास देशाची एकता अबाधित राहणार असल्याचे सांगितले. यावेळी मुख्याध्यापक म्हमाणे यांना जिल्हा कलाध्यापक संघाकडून आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार व कलाशिक्षक पंडित स्वामी यांना आदर्श कला शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संचालक शशिकांत रामपुरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सुंदर नृत्य सादर केले. इंग्लिश मिडीयमच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर कराटे क्रीडा प्रकारचे प्रात्यक्षिक सादर केले. शेवटी विद्यार्थ्यांना गोड खाऊ देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक- शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments