नागेश करजगी ऑर्किड स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन साजरा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील नागेश करजगी ऑर्किड स्कूल मध्ये २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते भारत मातेची पूजा करण्यात आली. त्यानंतर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी, संस्थेच्या सचिवा वर्षाताई विभुते, स्कुल व्यवस्थापक अक्षय चिडगुंपी, प्राचार्या रुपाली हजारे, ज्यू. कॉलेज प्राचार्या स्मिता कुलकर्णी, स्कुलच्या मार्गदर्शिका मीना पारखे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. श्रीकांत कुलकर्णी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपस्थित विद्यार्थ्याना यशस्वीतेचा कानमंत्र दिला.संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुमार दादा करजगी यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षक वर्गाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
स्कुलच्या प्राचार्या रुपाली हजारे यांनी संविधानाचे महत्व सांगून प्रजासत्ताक दिनाच्या सर्व विद्यार्थी व पालकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शाळेच्या आर एस पी व स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक असे पथ संचलन करुन उपस्थितांची वाहवा मिळविली. शाळेच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर करून आपल्या कलेला उपस्थितांची वाहवा मिळविली.
सदर कार्यक्रमाला पालकांनी देखील उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनुजा सुसलादी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
.png)
0 Comments