Hot Posts

6/recent/ticker-posts

युवा नेते रोहन सुरवसे पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

 युवा नेते रोहन सुरवसे पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा




पुणे (कटूसत्य वृत्त):- स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते रोहन सुरवसे पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
राजकीय आणि सामाजिक पटलावर, मतांच्या राजकारणासाठी काहीजण समाजसेवा करताना दिसतील.परंतु रोहन सुरवसे पाटील हे, ना... मतांच्या राजकारणासाठी, ना... जनतेला दाखवण्यासाठी, समाजसेवा करताना दिसणार नाहीत.
कारण आपण प्रत्येकजण  समाजाचे देणे लागतो, हा समस्त समाज माझा आहे.मानव ही जात माझी आहे आणि माणुसकी हा माझा धर्म आहे. हा निर्मळ आणि निःस्वार्थी हेतू ठेवत, पालखी सोहळा असो,महापुरुषांची जयंती असो, किंवा अन्य निमित्त असो रोहन सूरवसे पाटील हे मायेचा घास भरवताना निदर्शनात आले आहेत.
 तर अनेकदा राज्यातील विविध अनाथ आश्रमाला भेट देऊन,नेहमी ते मदतीचा हात देत आहेत.शिवाय गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे,रक्तदान शिबिर राबवणे,वृक्ष रोपण करणे असे विविध प्रकारचे उपक्रम ते स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेच्या वतीने राबवताना दिसतात.
रोहन सुरवसे पाटील यांनी समाजासाठी अखंड आयुष्य पणाला लावले आहे.समाज विकासात स्वतःला झोकून दिले आहे. थोर महापुरुषांचा आदर्श आणि त्यांचे विचार घेऊन,अत्यंत कमी वयात समाज कार्याचा प्रचंड मोठा ध्यास घेत त्यांनी, कर्तुत्वाचा आलेख गगनाला भिडवला आहे.
शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी असलेल्या,माळशिरस तालुक्यातील, कोंडबावी गावातून रोहन सुरवसे पाटील यांनी लहान वयातच, समाजकार्याचा विडा उचलला होता.अत्यंत मनमिळावूपणा, सोज्वळता, नम्रता, संयमता, उत्कृष्ट वाणी,सौजन्य आणि सहनशीलता या विविध गुणांमुळे रोहन सुरवसे पाटील यांच्या सानिध्यात महाराष्ट्र राज्यातला तमाम युवावर्ग आला आणि त्यांच्या सहकार्याने समाज कार्यात वाहून घेतले.आज त्यांच्या वाढदिवसा निमित्त,त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवित त्यांना आनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments