कर्मवीर कृषी महाविद्यालयाच्या आरोग्य तपासणी शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
बार्शी (कटूसत्य वृत्त):- श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषि महाविद्यालयाच्या राष्ट्रिय सेवा योजनेचे विशेष निवासी शिबिर कापसेवाडी येथे सुरू असून या दरम्यान नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व रक्त तपासणी शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी पि. टी. पाटिल यांच्या हस्ते करण्यात आले या मध्ये गावामधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या कार्यक्रमासाठी आरोग्य विभागाचे डॉ. खरात, डॉ. जोगदंड, नितीन कापसे, देशमुख, प्रा.अशा आदलिंगे व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थिनी साक्षी इनामे हिने केले तर आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.संतोष शेंडे यांनी केले.
.png)
0 Comments