पैसे वाटप करताना भाजप उमेदवाराच्या मुलास काँग्रेसच्या उमेदवाराने पकडले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, January 15, 2026

पैसे वाटप करताना भाजप उमेदवाराच्या मुलास काँग्रेसच्या उमेदवाराने पकडले

 पैसे वाटप करताना भाजप उमेदवाराच्या मुलास काँग्रेसच्या उमेदवाराने पकडले





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महानगरपालिका निवडणूक : प्रभाग २२ मध्ये भाजप उमेदवार अंबिका नागेश गायकवाड यांचे चिरंजीव प्रेम नागेश गायकवाड व मोहित गायकवाड यांना काँग्रेस उमेदवार कुणाल गायकवाड यांनी पैसे वाटप करताना रंगेहात पकडले.

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मध्ये निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आज दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी आला आहे. भाजपच्या उमेदवार अंबिका नागेश गायकवाड यांचे चिरंजीव प्रेम नागेश गायकवाड आणि मोहित गुरुदत्त गायकवाड हे मतदारांना मोदी हुडको येथे पैसे वाटप करत असताना प्रभाग २२ मधील काँग्रेसचे उमेदवार कुणाल गायकवाड यांनी त्यांना रंगेहात पकडले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. निवडणूक काळात मतदारांना पैशांच्या माध्यमातून प्रभावित करण्याचा हा प्रकार लोकशाही मूल्यांना तडा देणारा असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले.

काँग्रेसचे उमेदवार कुणाल गायकवाड यांनी सदर प्रकाराची तात्काळ माहिती निवडणूक प्रशासन व पोलिसांना दिली असून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. सत्ताधारी भाजपकडून पैसे वाटप करून निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages