Hot Posts

6/recent/ticker-posts

मविआ झाली तर ठीक, अन्यथा स्वबळावर लढू- प्रणिती शिंदे

 मविआ झाली तर ठीक, अन्यथा स्वबळावर लढू- प्रणिती शिंदे




मंगळवेढा (कटूसत्य वृत्त):- मित्र पक्षाचे उमेदवार भाजपच्या गळाला लागल्यामुळे महापालिका निवडणुकीत गडबड झाली त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसच्या सर्व इच्छुकांनी अर्ज भरून ठेवावेत महाविकास आघाडी झाली तर एकत्र लढू अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी असे आवाहन खा.प्रणिती शिंदे यांनी केले.

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती काँग्रेस कार्यालयात आयोजित करण्यात आल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष ॲड नंदकुमार पवार, राज्य सचिव अॅड रविकिरण कोळेकर, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे,पंढरपूर तालुकाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार मेतकुटे, सर्जेराव पाटील ,सुरेश कोळेकर, रवींद्र शिवशरण, शहराध्यक्ष अॅड राहुल घुले, बापूसाहेब अवघडे, नाथा ऐवळे, मारुती वाकडे;सिद्धेश्वर धसाडे,आयेशा शेख,कविता खडतरे,सत्तार इनामदार,संदीप पवार,सुनिता अवघडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना खा.शिंदे म्हणाले की,भाजप सध्या साम-दाम-दंड-भेद वापरून आता रक्तावर आले.आणि सत्तेच्या बळावर गलिच्छ राजकारण करत आहे अशा परिस्थितीत संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी निवडणूक लढवण्यासाठी तयार झाले. भाजपाकडे इच्छुक असलेल्या सत्ता, पैसा हवा आहे मात्र काँग्रेसकडे इच्छुकांना लोकशाही आणि संविधान वाचण्यासाठी लढायचे आहे. काँग्रेस मुक्त करण्याचा संकल्प भाजपाने केला मात्र तेच काँग्रेस युक्त भाजपा झाले.

नगरपरिषद निवडणूक चिन्हा ऐवजी आघाडीवर लढली. प्रांत स्तरावर येणाऱ्या सर्व निवडणुका पक्षीय चिन्हावर लढण्याचे ठरवल्यामुळे कार्यकर्त्यांनी पक्ष चिन्हावर तयार राहावे.या निवडणुकीत महाविकास आघाडी झाली तर ठीक आघाडी संदर्भातील निर्णय तुमच्या हातात आहे.भाजप विरोधात लढण्यासाठी इतर मित्र पक्षाला बरोबर घेऊन लढू.

मुलाखत देण्यासाठी काँग्रेस कार्यालयातील झालेली गर्दी पाहता सध्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात ग्रामीण भागात देखील मोठा रोष आहे त्यामुळे हा रोष मतपेटीतून व्यक्त करण्याची संधी आहे त्यामुळे मित्र पक्षाला सोबत घेऊन आम्ही तालुक्यात सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करू

प्रशांत साळे, तालुकाध्यक्ष काँग्रेस

काँग्रेस मधून चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणातून तब्बल 34 जणांनी मुलाखती दिल्या या मुलाखती खा. प्रणिती शिंदे, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार, कार्याध्यक्ष ॲड नंदकुमार पवार अँड अर्जुनराव पाटील सुरेश कोळेकर यांनी घेतल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments