मी बोलतोय…
माझ्या प्रिय मतदार बंधू-भगिनींनो…
सी. ए. सुशील बंदपट्टे
(शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस अधिकृत उमेदवार, प्रभाग क्रमांक ४)
माझ्या प्रिय मतदार बंधू-भगिनींनो,
मी सी. ए. सुशील बंदपट्टे, सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ४ मधून OBC प्रवर्गातून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून तुमच्या सेवेसाठी उभा आहे.
अवघ्या २१ व्या वर्षी देशातील सर्वांत कठीण मानली जाणारी चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा उत्तीर्ण होऊन मेहनत, प्रामाणिकपणा आणि निष्ठेच्या जोरावर गेल्या २० वर्षांत या क्षेत्रात भक्कम वाटचाल केली आहे. मात्र व्यवसायिक यशाबरोबरच समाजासाठी काहीतरी देणे, हीच माझ्या जीवनाची खरी प्रेरणा राहिली आहे.
सोलापूर शहरातील बाळीवेस येथील यल्लेश्वरवाडी भागात वडार समाजाच्या श्री अय्या गणपतीची २१ फुटी भव्य मूर्ती आणि मंदिर उभारणीचे कार्य बंदपट्टे कुटुंबाने मनापासून केले. या कार्यातून धार्मिक भावना आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
कोरोना महामारीच्या कठीण काळात, जेव्हा अनेक कुटुंबे अडचणीत होती, तेव्हा चंद्रनील सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून हजारो नागरिकांना मोफत धान्य, आवश्यक साहित्य आणि जनता भोजनाद्वारे अन्नपाकिटांचे वाटप करण्यात आले. त्या संकटाच्या काळात अनेक कुटुंबांसाठी आमचे कुटुंब आधार बनले.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे, या विश्वासातून परिसरातील गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील दरवर्षी सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य देण्याचा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. तसेच निराधार महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी आर्थिक मदत करून अनेक कुटुंबांना दिलासा देण्याचे कार्यही निस्वार्थपणे करण्यात आले आहे.
हे सर्व कार्य कोणताही गाजावाजा न करता, प्रसिद्धीच्या अपेक्षेविना, माणुसकीच्या भावनेतून केले गेले आहे. समाजातील गरजू घटकांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या पाठीशी उभे राहणे, हीच माझी खरी ओळख आहे.
आज सोलापूर शहराच्या विकासासाठी, सुशिक्षित, उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत विचारांचे नेतृत्व आवश्यक आहे. प्रभाग क्रमांक ४ मधील प्रत्येक नागरिकाच्या समस्या समजून घेऊन, त्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे, पारदर्शकपणे आणि सातत्याने काम करणारा प्रतिनिधी म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे.
माझ्या प्रिय मतदार बंधू-भगिनींनो,
तुमचा एक मत अनेक कुटुंबांची आशा आणि आधार ठरू शकते.
चांगल्या माणसांना संधी दिली, तर चांगले काम आपोआप घडते, हा माझा ठाम विश्वास आहे.
तुमच्या विश्वासाने आणि आशीर्वादाने मी प्रभाग ४ साठी आणखी मोठ्या प्रमाणात काम करू शकतो.
आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेला,
आपलाच,
सी. ए. सुशील बंदपट्टे

0 Comments