Hot Posts

6/recent/ticker-posts

विठ्ठलवाडीचे सेवानिवृत्त प्रा. छगन गुंड यांचे निधन

 विठ्ठलवाडीचे सेवानिवृत्त प्रा. छगन गुंड यांचे निधन 




माढा (कटूसत्य वृत्त):- विठ्ठलवाडी ता‌.माढा येथील रहिवासी व बार्शी येथील बी.पी.सुलाखे कॉमर्स कॉलेजचे सेवानिवृत्त प्रा.छगन ज्ञानदेव गुंड (वय-63) यांचे सोमवारी 15 डिसेंबर रोजी बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई,तीन चुलते, पत्नी,एक भाऊ,दोन बहिणी, एक मुलगा,एक मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे.ते विठ्ठलवाडीचे सेवानिवृत्त आदर्श मुख्याध्यापक बाळू गुंड व माजी ग्रामपंचायत सदस्य भिमराव गुंड यांचे पुतणे,माध्यमिक शिक्षक राजसिंह गुंड यांचे वडील,प्रा.कुंडलिक गुंड यांचे बंधू व माध्यमिक शिक्षक राजेंद्र गुंड,नारायण गुंड,प्राथमिक शिक्षक गणेश गुंड,सुधीर गुंड व दिनेश गुंड यांचे चुलत बंधू होत.
Reactions

Post a Comment

0 Comments