Hot Posts

6/recent/ticker-posts

समता इंग्लिश स्कूल येथे क्रीडा स्पर्धा संपन्न

 समता इंग्लिश स्कूल येथे क्रीडा स्पर्धा संपन्न




नातेपुते (कटूसत्य वृत्त):- समता शिक्षण प्रसारक मंडळ, समता इंग्लिश मिडीयम स्कूल नातेपुते येथे विविध खेळांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. संस्थेचे संस्थापक ड. बी. वा. राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली समता इंग्लिश मिडीयम स्कूल नातेपुते येथे क्रीडा स्पर्धांचे भव्य आयोजन करून मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सांघिक खेळ, वैयक्तिक खेळ घेण्यात आले. यश अपयश पचवीत खेळण्यातुन मुलांना आनंद मिळावा. यासाठी क्रीडा प्रकारामध्ये खो-खो, कबड्डी, लंगडी, क्रिकेट, धावणे, गोळा फेक, थाळीफेक, चेस, रस्सीखेच इत्यादी प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी संस्थेच्या आधारस्तंभलीलावती राऊत, मुख्याध्यापिका कविता लोंढे, उपमुख्याध्यापिका सुनीता फुले, सहशिक्षक चिकणे, विशाल राऊत आदीसह शिक्षिका, कर्मचारी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments