Hot Posts

6/recent/ticker-posts

ए.बी.एस.आरमाडा जातीच्या पाडीची तब्बल ₹2,55,000 ला विक्री

 ए.बी.एस.आरमाडा जातीच्या पाडीची तब्बल ₹2,55,000 ला विक्री


निमगाव (टें) (कटूसत्य वृत्त):-येथील प्रदीपकुमार भागवत पाटील यांच्या फार्मवर तयार झालेल्या ए.बी.एस.आरमाडा या उच्च प्रतीच्या जातीच्या पाडीची तब्बल ₹2,55,000 अशी विक्रमी किंमत मिळाली आहे.

उत्कृष्ट संगोपन, उत्तम पोषण आणि शास्त्रीय पद्धतीने तिसऱ्या जनरेशनमध्ये तयार करण्यात आलेली ही पाडी पूर्ण साईजमध्ये विकसित झाली असून ती दररोज ३५ लिटरपर्यंत उच्च दर्जाचे दूध उत्पादन देण्यास सक्षम आहे. पाडीचा दर्जा, आरोग्य आणि उत्पादनक्षमता पाहता खरेदीदारांकडून मोठी मागणी होती.

या यशामागे माजी आमदार बबनदादा शिंदे, माजी आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह (भैया) शिंदे, आदर्श सरपंच यशवंत (भैया) शिंदे, सुनील खापरे, तसेच कुर्डू गावचे नामांकित गाई व्यापारी व वस्ताद अण्णासाहेब ढाणे यांचे मार्गदर्शन लाभले असल्याची माहिती देण्यात आली.

या विक्रीमुळे परिसरातील पशुपालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उच्च उत्पादकतेच्या दुभत्या जनावरांच्या संगोपनासाठी ही प्रेरणादायी घटना ठरली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments