महाराष्ट्रातील पहिले अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) कॅम्पसमध्ये अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर (एसीआयसी) स्थापन करण्याबाबत नीती आयोगासोबत सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे स्वेरी पंढरपूर हे अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर असणारे महाराष्ट्रातील पहिले केंद्र ठरणार आहे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वेरीचे संस्थापक व स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.सोलापूर विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पी. एम. पवार यांनी स्वेरीची संशोधन संस्कृती, समाज व शेतकऱ्यांसाठी केलेले योगदान तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समाजविकास साधण्याबाबत सविस्तर माहिती दिली. व्हील्स ग्लोबल फाऊंडेशनच्या सुजाता नरसिंहन व महेश वैद्य यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अटल इनोव्हेशन मिशनचे कार्यक्रम प्रमुख प्रतीक देशमुख म्हणाले, “नीती आयोगाच्या माध्यमातून समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी इनोव्हेशन सेंटर्सची स्थापना करण्यात येत आहे. या केंद्राद्वारे नवनवीन संकल्पना, उपयुक्त उत्पादने आणि समाजोपयोगी नवकल्पनांना प्रोत्साहन दिले जाईल. समाजाच्या उन्नतीसाठी व लोकांच्या फायद्यासाठी असलेल्या उत्पादनांच्या निर्मितीसाठी हे केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल.”
यावेळी अटल इनोव्हेशन मिशनचे नावीन्यपूर्ण उपक्रम प्रमुख वितस्ता तिवारी, दीपाक्षी जिंदाल, गोपाळपूरचे सरपंच पांडुरंग देवमारे, पंढरपूरच्या प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्नेहा रोंगे, सचिन पाटील, मोहन पाटील, सचिन वाघमारे, संभाजी शिंदे, नंदा मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच स्वेरीचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष एस. टी. राऊत, सचिव डॉ. सूरज रोंगे, एन. एम. पाटील, धनंजय सालविठ्ठल, एन. एस. कागदे, आर. बी. रिसवडकर, विश्वस्त एच. एम. बागल, बी. डी. रोंगे, डॉ. मीनाक्षी पवार यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. हर्षवर्धन रोंगे यांनी काम पाहिले, तर सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर यांनी केले.
.png)
0 Comments