Hot Posts

6/recent/ticker-posts

नेताजी शिक्षण संस्थेत वक्तृत्व व श्लोकपाठांतर स्पर्धां उत्साहात

 नेताजी शिक्षण संस्थेत वक्तृत्व व श्लोकपाठांतर स्पर्धां उत्साहात




सोलापूर  (कटूसत्य वृत्त):-श्री बृहन्मठ होटगी मठाचे परमपूज्य गुरुवर्य तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या आठव्या पुण्यस्मरणानिमित्त निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस कन्नड भाषा व कन्नड संस्कृती संवर्धक कुंभार समाज शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत ८८ तर श्री सिद्धांत शिखामणी श्लोकपाठांतर स्पर्धेत ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम परमपूज्य तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त शिक्षक षडाक्षरी स्वामी, सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापक शिवानंद मेणसंगी, माजी प्राचार्य विजयकुमार हुल्ले, माजी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर म्हेत्रे, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, आचार्य शिक्षाशास्त्री प्रवीण काटकर, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रवीण काटकर, प्रा. राजशेखर पुजारी, प्रतीक पाटील, धरेप्पा भांजे, मिनाक्षी शेटे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
यावेळी माजी प्राचार्य सुभाष धुमशेट्टी म्हणाले, परमपूज्य योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या महान कार्यामुळे हजारो विद्यार्थी आज ज्ञानसंपादन करीत आहेत. उत्तम वक्ता होण्यासाठी अभ्यास, वाचन व विचारांची शिस्त आवश्यक आहे. वक्तृत्व स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना मिळते व आत्मविश्वास वाढतो.संस्कृत अभ्यासक प्रवीण काटकर यांनी सिद्धांत शिखामणी ग्रंथातील तत्त्वज्ञान व सुभाषितांवर सखोल विवेचन करताना म्हणाले, नेताजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार हे परमपूज्य गुरुवर्यांचे अध्यात्मिक विचार, पूजा-पाठ व गुरुचिंतन नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे प्रेरणादायी कार्य करीत आहेत. हि बाब कौतुकास्पद आहे. अंतर्गत परीक्षक म्हणून राजकुमार मरगुरे, मारुतीराव कांबळे, भारती पाटील, भाग्यश्री महाजन, संगीता नरगिडे, सुनीता पवार, प्रशांत बत्तुल, जयश्री बिराजदार, काशिनाथ माळगोंडे, विश्वनाथ तंबाके, षडाक्षरी हिरेमठ, बसवराज तेग्गेळी, प्रशांत स्वामी यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल पाटील यांनी केले तर विश्वाराध्य मठपती यांनी आभार मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments