खेळामुळेच विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्व गुण- सावंत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 16, 2025

खेळामुळेच विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्व गुण- सावंत

 खेळामुळेच विद्यार्थ्यांच्या अंगी नेतृत्व गुण- सावंत




कोंडी (कटूसत्य वृत्त):- खेळ आहे जीवनाचे अविभाज्य अंग असून खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, सहकार्य, शिस्त, आणि खेळाडू वृत्ती या गुणांचा विकास होतो. 
त्यामुळे विद्यार्थ्यांनी तन-मन-धन ओतून या स्पर्धेमध्ये आपले नाव रोशन करावे आणि मिळालेल्या संधीचे सोने करावे. 
आजची हार सुद्धा उद्याची जीत घेऊन येत असतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी पराभव झाला तरी खचून जाऊ नये असे अनमोल मार्गदर्शन पोलीस अंमलदार विशाल सावंत यांनी जाणता राजा बहुउद्देश शिक्षण प्रसारक मंडळ , संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर कोंडी येथे आयोजित केलेल्या क्रीडा सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी केले. 
कार्यक्रमासाठी  निर्भया पथक च्या रणरागिणी महानंदास्वामी त्याचबरोबर अंमलदार किरण तोडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी उपसरपंच शिवाजी निळ , संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत आणि ग्रामपंचायत सदस्य शशिकांत भोसले आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

 स्वामी विवेकानंद स्कूल खेडचे क्रीडा शिक्षक विठ्ठल वाकचौरे, शिवाजी निळ आणि सोमनाथ राऊत यांच्या लाल फीत कापून क्रीडा सप्ताहाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. 

त्यानंतर मान्यवरांनी विविध प्रकारे आपले मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. 

त्यानंतर संस्थापक अध्यक्ष गणेश  नीळ यांनी आजवर विद्यार्थ्यांनी केलेली क्रीडा स्पर्धेतील चमकदार कामगिरीचे आराखडा सादर केला. 

त्यानंतर प्रथम सामना कबड्डी जिजाऊ आणि सावित्री या दोन प्रतिस्पर्धी संघांमध्ये संपन्न झाला. 

हा त्यानंतरच्या सत्रामध्ये कबड्डी, खो-खो, धावणे, क्रिकेट, लिंबू चमचा गोळा फेक असे विविध स्पर्धा घेण्यात आल्या. 

विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी म्हणून तीन दिवस क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात क्रीडा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. 

विद्यार्थ्यांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

क्रीडा शिक्षक दिलीप भोसले आणि सर्व शिक्षक परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब नीळ यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages