अधिक परतावा देण्याचे अमिष दाखवुन महिलेची फसवणुक - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 16, 2025

अधिक परतावा देण्याचे अमिष दाखवुन महिलेची फसवणुक

 अधिक परतावा देण्याचे अमिष दाखवुन महिलेची फसवणुक





अकलूज (कटूसत्य वृत्त):- पैसे गुंतवणुकीवर अधिक परतावा देण्याचे अमिष दाखवुन फसवणुक करणारे कंपनीवर व सबंधीत इसमांविरूध्द अकलुज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.        
          याबाबत फिर्यादी महिला अकलुज (ता.माळशिरस) येथील रहिवासी असुन त्यांना नवनाथ जगन्नाथ अवताडे रा.फळवणी (ता. माळशिरस जि. सोलापूर), सध्या रा. राजश्री शाहु सोसायटी बिबवेवाडी, पुणे,शुभम नवनाथ अवताडे,रा. फळवणी ता.माळशिरस जि. सोलापूर, सध्या रा.राजश्री शाहु सोसायटी, बिबवेवाडी,पुणे,सुवर्णा नवनाथ अवताडे रा.फळवणी ता. माळशिरस जि. सोलापूर सध्या रा. राजश्री शाहु सोसायटी,बिबवेवाडी, पुणे,अशोक आगतराव पवार रा. उघडेवाडी ता.माळशिरस जि. सोलापुर,उमा अशोक पवार रा. उघडेवाडी ता.माळशिरस जि. सोलापुर,आदेश अशोक पवार रा. उघडेवाडी ता.माळशिरस जि. सोलापुर यांनी इन्फिनिटी बीकॉन फायनान्शिअल सर्विसेस,आय बी प्रो डेस्क कंपनी MASTERSYNERGY EDUTECH LLP या कंपनी काढुन फिर्यादी व गुंतवणुकदारास त्यांचे कंपनीमध्ये पैसे गुंतवणुकीवर प्रति महा १० टक्के परतावा देण्याचे अमिष दाखवुन फिर्यादी यांचेकडुन २४ लाख ५० हजार तसेच इतर १४ गुंतवणुकदारांकडुन मोठ्या प्रमाणात गुंतवणुका घेवुन त्यांना कोणताही परतावा न देता तसेच त्यांची गुंतवणुक रक्कम परत न देता फिर्यादी व गुंतवणुकदारांची खुप मोठी आर्थिक फसवणुक केलेली आहे.म्हणुन वर नमुद कंपणीचे संचालक व एजंट यांचे विरूध्द अकलुज पोलीस ठाणेस गु र नं ८१५/२०२५ बी एन एस ३१८(४), ३५१ (२), ३(५) सह महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्थांमधील) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९ कलम ३,४ प्रमाणे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.यातील आरोपीतांनी सोलापुर,पुणे, अहिल्यानगर जिल्हयातील बरेच नागरीकांकडुन मोठ्या प्रमाणे गुंतवणुक रकमा स्विकारल्याचे तपासामध्ये निष्पन्न होत असुन त्याची व्याप्ती मोठी आहे.त्यामुळे यातील गुंतवणुकदार व आरोपी यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.तरी याव्दारे नागरीकांना आव्हान करण्यात येते की,इन्फिनिटी बीकॉन फायनान्शिअल सर्विसेस, आय बी प्रो डेस्क कंपनी, MASTERSYNERGY EDUTECH LLP या किंवा अशा प्रकारच्या कंपनीमध्ये गुंतवणुक केलेल्या गुंतवणुकदारांनी त्यांची फसवणुक झाली असल्यास त्यांचे गुंतवणुकीचे कागदपत्रांसह अकलुज पोलीस ठाणेस तात्काळ संपर्क साधावा.असे आवाहन अकलूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक निरज उबाळे यांनी केले आहे.
        या गुन्हयाचा अधिक तपास पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर,उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके, पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगुटे,पोहेकों अमोल बकाल,समीर पठाण हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages