श्री बाणलिंग विद्यालय फोंडशिरस व स.मा.वि. अकलूज सर्वसाधारण विजेतेपदाचे मानकरी
अकलूज (कटूसत्य वृत्त):- प्रताप क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या ४८व्या राज्यस्तरीय शालेय मुला मुलींच्या नृत्य स्पर्धेत ग्रामीण गटात श्री बाणलिंग विद्यालय फोंडशिरस व शहरी गटात सदाशिवराव माने विद्यालय अकलूज यांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
अभिनेते वैभव चव्हाण, मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र बक्षिस देण्यात आले. यावेळी अँड. नितीन खराडे ,दिपक खराडे, शि.प्र. मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे,सहसचिव हर्षवर्धन खराडे,परीक्षक योगेश देशमुख कुणाल मसाले, प्रेम आर्लेकर, उपाध्यक्ष पोपट भोसले, बिभीषण जाधव, डॉ.विश्वनाथ आवड,संजय गळीतकर यांचेसह संचालक,सदस्य,कलाकार, रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रस्ताविकात स्वरूपाराणी मोहिते पाटील म्हणाल्या, प्रताप क्रीडा मंडळाचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शना खाली कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. ग्रामीण कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या स्पर्धेचा उद्देश असून मागील ४८ वर्षात ६० हजारा पेक्षा अधिक कलाकारांना येथे संधी प्राप्त झाली आहे. यावर्षी २ हजार ३ विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले.१२६ बाहेरच्या शाळांनी सहभाग घेतला.तर जि.प.शाळांना प्रत्येकी पाच हजार प्रमाणे १ लाख २५ हजाराचे अनुदान मंडळाने दिले आहे. स्पर्धेचे यश हे कलाकार,पालक, मार्गदर्शक शिक्षक व मंडळाच्या सर्व सदस्यांचे आहे.
स्पर्धेचा निकाल-
गट (११ वी ते महाविद्यालय) प्रासंगिक नृत्य प्रथम क्रमांक सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अँण्ड रिसर्च शंकरनगर अकलूज,
द्वितीय शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज, तृतीय क्रमांक- (विभागून) महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला, यशवंतनगर व रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज,
गट ग्रामीण (५ वी ते १०वी) प्रासंगिक नृत्य, प्रथम क्रमांक
सदाशिवराव माने विद्यालय, माणकी
द्वितीय श्री बाणलिंग विद्यालय, फोंडशिरस, तृतीय मोरजाई विद्यालय मोरोची,गट शहरी, प्रथम क्रमांक महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर,
द्वितीय (विभागून) सदाशिवराव माने विद्यालय अकलूज, जिजामाता कन्या प्रशाला अकलूज,
चौकट...
१) प्रताप क्रीडा मंडळ मागील 48 वर्षापासून विद्यार्थ्यांसाठी हा मंच उपलब्ध करून देत आहे. भविष्यात यातून खूप मोठे कलाकार निर्माण होतील.
--- वैभव चव्हाण (अभिनेते)
चौकट...
आंतरराष्ट्रीय पध्दतीचा हा
समूहनृत्य स्पर्धेचा कार्यक्रम असल्याचे जाणवते. असा शिस्तबद्ध कार्यक्रम कुठेही पहावयास मिळत नाही. एवढा उत्साह व आनंद कलाप्रेमी मध्ये दिसून आला. कलाकारां साठी ही संधी असल्याचा मला आनंद आहे.
--- अभिनेत्री प्राजक्ता घाग.

0 Comments