Hot Posts

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांना मॅट्रीकपुर्व श‍िष्यवृत्ती योजना लागू

 विद्यार्थ्यांना मॅट्रीकपुर्व श‍िष्यवृत्ती योजना लागू

 

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-  जिल्ह्यातील सर्व शासन मान्य शासकीय/खाजगी अनुदानित विद्यालयातील विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पीएम- यशस्वी या एकछत्री योजनेअंर्तगत भारत सरकार मॅट्रीकपुर्व श‍िष्यवृत्ती योजना सन २०२५-२६ पासून लागू करण्यात आली असल्याचे पत्रकान्वये सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर यांनी कळव‍िले आहे.
            या योजनेचे अर्ज एनएसपी पोर्टलवर शासन निर्णय दि. २० जुन २०२५ मधील परिशिष्ट-अ मध्ये दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहून  30 जानेवारी 2026 अखेर ऑनलाईन अर्ज भरणेबाबत गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती, प्रशासन अधिकारी प्राथमिक शिक्षण मंडळ, म. न. पा. सोलापूर व सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सोलापूर या कार्यालयाशी संपर्क साधून दि. ३१ जानेवारी, २०२६ अखेर ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत आवाहन प्रस‍िध्दी पत्रकान्वये केले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments