पंचशिलनगर शाळेचे घवघवीत समूहनृत्य स्पर्धेत यश - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, December 16, 2025

पंचशिलनगर शाळेचे घवघवीत समूहनृत्य स्पर्धेत यश

 पंचशिलनगर शाळेचे घवघवीत समूहनृत्य स्पर्धेत यश




अकलूज (कटूसत्य वृत्त):- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पंचशीलनगर केंद्र सदाशिवनगर (ता. माळशिरस) यांनी प्रताप क्रीडा मंडळ अकलूजच्या वतीने  घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय समूहनृत्य स्पर्धेत ( इयत्ता १ ते ४) लहान गट (ग्रामीण) स्पर्धेत चतुर्थ क्रमांक पटकावला.पंचशीलनगर शाळेचे विद्यार्थी विविध उपक्रमातून आपली गुणवत्ता सिद्ध करतात.समूहनृत्य स्पर्धेत या शाळेने विविध  स्पर्धेत आपल्या कलेची चुणूक दाखवली. अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या प्रताप क्रीडा मंडळाच्या समूहनृत्य स्पर्धेत या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले त्याबद्दल मंडळाच्या अध्यक्षा स्वरूपाराणी मोहिते- पाटील व इतर मान्यवर यांच्या शुभहस्ते बक्षीस व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.             
               या यशाबद्दल माळशिरस  तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सुषमा महामुनी,विस्ताराधिकारी भरते साहेब,सदशिवनगर केंद्राचे केंद्रप्रमुख हमीद मुलाणी,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रियांका भोसले,उपाध्यक्ष नेताजी धाईंजे, सदस्य,पालक वर्ग व सर्व स्तरातून शिक्षक व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.या समुह नृत्य गीतासाठी शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल मासाळ व उपशिक्षक समाधान सावंत यांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages