स.म. कारखान्यामध्ये पशुधनासाठी लसीकरण शिबिर संपन्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 10, 2025

स.म. कारखान्यामध्ये पशुधनासाठी लसीकरण शिबिर संपन्न

स.म. कारखान्यामध्ये पशुधनासाठी लसीकरण शिबिर संपन्न



अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षी कै. शंकरराव मोहिते-पाटील यांनी १९६० साली माळशिरस तालुका शंकरनगर- अकलूज या ठिकाणी या सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली आहे.त्यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शना खाली व कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदरचा कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
कारखान्याच्या संचालिका कु.स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या संकल्पनेतून कारखान्याच्या संलग्न असणाऱ्या सर्व घटकांच्या सोयी व सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न अखंडितपणे चालू आहे.
            सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२५-२०२६ सुरू असून या हंगामामध्ये ऊस तोडणी-वाहतूकीचे कामाकरिता आलेल्या पशुधनासाठी लसीकरण शिबीर-मोहीम राबविण्यात आली.या शिबिरात त्यांच्या आरोग्याची तपासणी शंकरनगर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.एच.एम.काळे व त्यांच्या टीमने करून पशुधनास द्यावयाचा योग्य खुराक,आरोग्य विषयक घ्यावयाची काळजी याबाबतची माहिती देण्यात आली.
कारखाना सिझनमध्ये वेळोवेळी आवश्यकतेनुसार शिबिराची अथवा जनावरांच्या आरोग्याची काळजी घेण्याची प्रथा नेहमीच या कारखान्याने जपलेली आहे.
         सध्या थंडीची लाट चालू असून ऊस तोडणी वाहतुकीकरिता आलेल्या पशुधनास कोणताही आजार अथवा साथीची लागण होऊन त्यांच्या जीवितास धोका होऊ नये याकरिता कारखान्याने या शिबिराचे आयोजन करून तोडणी वाहतूक कामासाठी आलेल्या पशुधनाची योग्य ती काळजी व खबरदारी घेतलेली आहे.सदर कार्यक्रम प्रसंगी सहकार महर्षी कारखान्याचे बैलगाडी ऊस तोडणी वाहतूक कॉन्ट्रॅक्टर,मुकादम,शेती विभागाचे शेतकी अधिकारी रविराज उर्फ समाधान चव्हाण व त्यांचा स्टाफ उपस्थित होता
         

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages