Hot Posts

6/recent/ticker-posts

चंद्रमौळी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला सातव्या वर्षात यशस्वी पदार्पण

चंद्रमौळी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला सातव्या वर्षात यशस्वी पदार्पण



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ तालुक्यातील चंद्रमौळी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, मोहोळ ही स्थानिक पातळीवर विश्वासार्ह आर्थिक सेवा देणारी संस्था ९ डिसेंबर २०२५ रोजी सहा वर्षे पूर्ण करून सातव्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत असल्याची माहिती चेअरमन राजेश खपाले यांनी दिली. संस्थापक अध्यक्ष डॉ.कौशिक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापनेपासून सातत्याने सभासद, ग्राहक, ठेवीदार आणि हितचिंतकांचा मिळालेला सक्रीय पाठिंबा आणि विश्वास यामुळेच संस्था अल्पावधीत ठोस पायाभूत प्रगती साधू शकली आहे.

संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या सहा वर्षांत पारदर्शी आर्थिक व्यवस्थापन, वेळेवर कर्जपुरवठा, ठेवीदारांसाठी सुरक्षितता, तसेच ग्रामीण भागातील उद्योजक व सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सेवा यामुळे संस्थेने परिसरात ठळक स्थान निर्माण केले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेला भक्कम आधार देण्याच्या उद्देशाने सुरू झालेली ही पतसंस्था आज मोहोळ परिसरातील अनेक कुटुंबांसाठी आर्थिक पाठबळ ठरत आहे.

वर्धापन दिनानिमित्त मंगळवार, दि. ०९ डिसेंबर २०२५ रोजी मार्केट यार्ड, मोहोळ येथील शाखेमध्ये विशेष पूजा व सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे चेअरमन, उपाध्यक्ष, तज्ञ संचालक, सर्व संचालक आणि कर्मचारीवृंद उपस्थित राहणार असून सभासद व हितचिंतकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

चंद्रमौळी पतसंस्थेने आपल्या वाटचालीत सातत्य, सेवा व पारदर्शकतेचा आदर्श जपत सातव्या वर्षात प्रवेश केला असून आगामी काळातही ग्रामीण भागाच्या आर्थिक प्रगतीसाठी अधिक सक्षम उपक्रम राबवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
सदर संस्थ यशस्वी होण्यासाठी व्हा. चेअरमन राकेश देशमाने, महावीर चटके, सुधीर गायकवाड, सुग्रीव व्यवहारे, शिवाजी चव्हाण, संजय विभूते, मोहन होनमाने, राजेंद्र कसबे, संगीता भोसले, संचालक अर्चना गायकवाड, कौशिक गायकवाड, तज्ञ संचालक सुरेश घाटगे व सर्व संचालक व सर्व कर्मचारी वृंद, मोहोळ ही मंडळी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments