Hot Posts

6/recent/ticker-posts

पाणी व स्वच्छता कर्मचारी यांचे प्रश्नावर शासन सकारात्मक - गुलाबराव पाटील

पाणी व स्वच्छता कर्मचारी यांचे प्रश्नावर शासन सकारात्मक - गुलाबराव पाटील




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील पाणी व स्वच्छता कर्मचारी राज्य कृती समितीच्या वतीने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री मेघना साकोरे यांना निवेदन देणेत आले.  पाणी पुरवठा व स्नच्छता विभागातील कर्मचारी यांचे प्रश्न सोडविणेसाठी मुंबई येथे प्रधान सचिव यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेणेत येणार आहे. दरम्यान कर्मचारी यांचे मानधन व प्रश्न निकाली निघे पर्यंत काळ्या फिती लावून असहकार आंदोलनावर कृती समिती ठाम आहे.
आज कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत, उपाध्यक्ष बंडू हिवरे , नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यातील पाणी व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांनी आज  हैद्राबाद हाऊस येथे  प्रधान सचिव पराग जैन यांची भेट घेतली.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण साठी राज्य स्तरावर निधी असूनही दोन महिने वेतन नाही. जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन साठी वेतना साठी स्वतंत्र तरतुद करणेत यावी. मुख्यमंत्री यांनी सुचना देऊन संघटनेची बैठक राज्य स्तरावर घेणेत आली नाही. आकृतीबंध तयार करणे बाबत मुख्यसचिवांनी लेखी युचना देऊनही त्याची अंमलबजावणी नाही.  न्यायालयाचे निर्णयावर कर्मचारी याॅना सेवेत कायम करणेची कार्यवाही करणेत आलेली नाही. अशा प्रमुख मागण्या करणेत आल्या.
त्यानंतर राज्य कृती समितीची पदाधिकारी यांची बैठक रवी भवन येथे घेणेत आली. या बैठकीत कृती समिती आंदोलनावर ठाम आहे. जो पर्यंत वेतन खातेवर जमा होत नाही तो पर्संत काळ्या फितू लावून असहकार आंदोलन सुरू राहणार ठेवणेवर कर्मचारी यांनी एकमुखी शिक्कामोर्तब केले.
नागपूर चे निखील रौंदळकर, गडचिरोलीचे अमित माणुसमुरे, प्रशांत सातव अमरावती, सचिन खाडे, विनोद खोब्रागडे वर्धा, संपदा बोधनकर वर्धा, नागपूर चे विक्रांत इंगळे, दिनेश मासुदकर, प्रविण खंदारे, प्रशांत उमक, आशिष रावळे, अजय गजापूरे भंडारा, राजेशकुमार चौधरी, चैताली देशमुख, अंजली पाटणकर, हर्षा संभारे, श्वेता पाबळे यांचेसह महिला प्रतिनिधी उपस्थित होते.

पाणी व स्वच्छता कर्मचारी यांचे प्रश्नावर शासन सकारात्मक - मंत्री गुलाबराव पाटील
………………..
राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांचे प्रश्न सोडविणे साठी शासन सकारात्मक आहे. जलजीवन मिशन साठी निधी नाही. स्वच्छ भारत मिशन साठी उपलब्ध असलेले निधीतून वेकन अदा करणे, आकृतीबंध व कायम करणेचे प्रश्नाबाबत शासन सकारात्मक असल्याचे राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.

मुंबई किंवा नागपुरात येथे कृती  समितीची बैठक घेऊन अडचणी सोडविणार- प्रधान सचिव पराग जैन
———————————
मुख्यमंत्री यांनी निवेदनावरील  दिलेले सुचनेनुसार कृती समितीची बैठक मुंबईत घेणेत येणार आहे. या विषयाशी संबंधित सर्व अधिकारी यांचेशी चर्चा करून मार्ग काढणेत येईल. न्यायालयीने दिलेले निकाल, मुख्य सचिवांनी दिलेले सुचना व वेतनातील अडथळे दूर करणे साठी नागपूर किंवा मुंबईत तातडीची बैठक घेणेचे सुचना सहसचिव यांना दिल्या.

पाणी व स्वच्छता कर्मचारी यांचे प्रश्नाबाबत राज्यातील १५ आमदारांचे तारांकित प्रश्न ..!
……………
राज्यातील विविध १५ आमदारांनी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत काम करणारे कर्मचारी यांचे वेतनात होत असलेली दिरंगाई व विविध अडचणी बाबत तारांकित प्रश्न विधान सभा व विधान परिषदेत सादर केले आहेत. सर्वप्रथम रायगड चे आमदार व अमरावतीचे आमदार देवराव भोंगळे व आमदार संदीप जोशी यांनी या प्रश्नास सर्व प्रथम वाचा फोडली आहे. त्यानंतर १३ आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केले आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments