Hot Posts

6/recent/ticker-posts

विकास‎ हा आमचा‎ धर्म’;‎ आंबेडकर‎ चळवळीचा ऐतिहासिक‎ आरंभ-अण्णा‎ बनसोडे

 विकास‎ हा आमचा‎ धर्म’;‎ आंबेडकर‎ चळवळीचा ऐतिहासिक‎ आरंभ-अण्णा‎ बनसोडे






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक‎ २२ च्या‎ विकासाचा नवा‎ इतिहास‎ लिहिला गेला राष्ट्रवादी काँग्रेस‎ पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष‎ व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार‎ यांच्या विशेष निधीतून, प्रदेशाध्यक्ष‎ खासदार सुनील तटकरे‎ यांच्या सक्रिय‎ सहकार्याने रामवाडीला तब्बल‎ १‎ कोटी‎ रुपयांचा विक्रमी निधी‎ मंजूर‎ झाला आहे.
प्रदेश‎ उपाध्यक्ष किसन‎ जाधव‎ आणि कार्यसम्राट‎ नगरसेवक‎ नागेश गायकवाड यांच्या‎ सातत्यपूर्ण‎ धडपडीचे‎ हे फलित‎ असून, आंबेडकरी‎ समाजासाठी‎ हा दिवस‎ विकासाचा‎ निर्णायक‎ टप्पा‎ ठरला. या‎ निधीतून डॉ. बाबासाहेब‎ आंबेडकर‎ सांस्कृतिक‎ भवन‎ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे‎ सांस्कृतिक‎ भवन‎ या‎ दोन‎ भव्य‎ प्रकल्पांना‎ प्रत्येकी‎ ५०‎ लाखांची‎ भक्कम‎ तरतूद करण्यात‎ आली‎ असून, या दोन्ही‎ योजनांचे‎ भूमिपूजन विधानसभेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री‎ अण्णा बनसोडे‎ यांच्या‎ हस्ते‎ अत्यंत उत्साहात पार‎ पडले.‎ दरम्यान यावेळी रामवाडी परिसरातील‎ श्रद्धास्थान अंबाबाई‎ मंदिरात‎ तुळजापूरच्या‎ तुळजाभवानी‎ इतकेच‎ भक्तांची‎ आढळ श्रद्धा‎ असून‎ या देवीचे अण्णा‎ बनसोडे यांनी मनोभावे दर्शन‎ घेतले दर्शनानंतर इच्छा भगवंताची‎ परिवारातर्फे क्रेन‎ द्वारे अण्णा साहेबांना‎ भव्य‎ हार घालून‎ जल्लोषात‎ स्वागत करण्यात‎ आले‎ "राष्ट्रवादी पुन्हा"‎ या‎ गाण्याच्या ठेक्यावर‎ कार्यकर्त्यांनी‎ निनाद करत उत्साहन शिगेला‎ पोहोचवला. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी‎ शहर‎ जिल्हाध्यक्ष संतोष‎ पवार,‎ कार्याध्यक्ष‎ जुबेर‎ बागवान, इच्छा‎ भगवंताची परिवाराचे‎ मार्गदर्शक‎ तथा‎ आधारस्तंभ‎ लक्ष्मण मामा जाधव, प्रदेश‎ सचिव इरफान‎ शेख, आनंद मुस्तारे, प्रदेश‎ युवक‎ सरचिटणीस‎ चेतन‎ नागेश‎ गायकवाड, माजी‎ नगरसेविका नूतन प्रमोद‎ गायकवाड, संजय‎ भडंगे,‎ सुनील‎ कांबळे, जनरल सेक्रेटरी‎ प्रमोद‎ भोसले, महिला‎ आघाडी‎ कार्याध्यक्ष‎ चित्रा‎ कदम, शामराव गांगर्डे, पंचशीलक‎ मंडळाचे‎ प्रमुख सागर‎ कांबळे,‎ संतोष उर्फ‎ ऋतिक‎ गायकवाड,‎ दीपक गायगवळी, महात्मा‎ फुले‎ प्रशालेचे‎ संस्थापक गायकवाड मामा, राजू काका‎ जाधव,‎ शोभाताई‎ गायकवाड,‎ लक्ष्मी कांबळे,‎ मीना गायकवाड, सरोजनी जाधव,प्रमिला स्वामी, योजना कामतकर, विद्यासागर‎ उर्फ पिंटू‎ जाधव,‎ उत्तम‎ कदम, बाशा शेख,‎ श्याम‎ जाधव,‎ सिकंदर शेख, कोशेन कुरेशी, रवींद्र‎ गायकवाड,‎ डॉली‎ जाधव, माऊली जरग, वृषभ पेटी,‎ वसंत‎ कांबळे, माणिक‎ कांबळे, फिरोज पठाण, सचिन‎ अंगडीकर‎ आदींसह ईच्छा‎ भगवंताची परिवाराचे‎ सदस्य उपस्थिती‎ होती. उपस्थित मान्यवरांचे स्वागत व‎ सत्कार किसन‎ जाधव,नागेश गायकवाड‎ आणि चेतन‎ गायकवाड‎ यांनी केले.कार्यक्रमाच्या‎ सुरुवातीला गौतम‎ बुद्ध,‎ डॉक्टर बाबासाहेब‎ आंबेडकर,‎ महात्मा फुले‎ आणि अण्णाभाऊ साठे यांच्या‎ प्रतिमांचे पूजन‎ करण्यात आले. त्यानंतर छत्रपती‎ संभाजीनगर येथून आलेल्या भिक्खूंच्या उपस्थितीत बौद्ध स्तोत्र पठणाने संपूर्ण‎ परिसर भारावून‎ गेला.‎ सर्वात भावनिक क्षण म्हणजे चिवरदान सोहळा,‎ ज्यात‎ अण्णा बनसोडे‎ यांनी‎ भिक्खूंना चिवर अर्पण करीत‎ बौद्ध परंपरेप्रती‎ आदर आणि‎ सामाजिक बांधिलकी व्यक्त‎ केली. निधीचे‎ महत्त्व‎ अधोरेखित करताना‎ अण्णा‎ बनसोडे म्हणाले, प्रभाग २२‎ च्या विकासाचे‎ घोडे‎ वेगाने‎ धावण्यामागे‎ जाधव–गायकवाड यांची‎ तळमळ आहे. त्यांच्या जिद्दीमुळेच‎ आंबेडकरी समाजाला आधुनिक,‎ दर्जेदार‎ सांस्कृतिक पायाभूत‎ सुविधा‎ मिळत आहेत.‎ विकास आणि‎ सर्वधर्मीयांची‎ एकजूट‎ हीच राष्ट्रवादीची‎ खरी‎ ओळख‎ आहे.
यावेळी‎ बोलताना किसन‎ जाधव‎ यांनी रमाई घरकुल योजनेतील जाचक‎ अटी तातडीने शिथिल‎ करून वास्तविक‎ गरजू‎ लाभार्थ्यांना‎ मदत‎ मिळावी, अशी सकारात्मक मागणी‎ अण्णा‎ बनसोडे यांच्याकडे‎ केली.
तसेच‎ प्रभागात‎ आणखीन कोट्यवधी‎ रुपयांचा‎ निधी खेचून‎ आणण्याचा निर्धारही त्यांनी‎ व्यक्त‎ केला. कार्यक्रमात‎ आणखी एक महत्त्वाचा उपक्रम पार‎ पडला‎ ईच्छा भगवंताची परिवाराच्या‎ वतीने‎ तब्बल दोन‎ हजाराहून अधिक महिलांना‎ साड्यांचे वाटप‎ करण्यात आले, ज्यामुळे‎ कार्यक्रमाला‎ सामाजिक समतोलाचा‎ आणि‎ लोकाभिमुखतेचा‎ सुंदर स्पर्श लाभला.‎ हजारो नागरिकांच्या जंगी उपस्थितीत‎ साजरा झालेला‎ हा सोहळा‎ रामवाडीच्या विकासदिशेने‎ उचललेले सुवर्ण पाऊल‎ ठरला.‎

Reactions

Post a Comment

0 Comments