Hot Posts

6/recent/ticker-posts

काव्यमित्र संस्थेचा पुरस्कार सुजाता जुगदार यांना जाहीर

 काव्यमित्र संस्थेचा पुरस्कार सुजाता जुगदार यांना जाहीर





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- काव्य मित्र संस्था, पुणेच्यावतीने देण्यात येणारा यंदांचा  राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार सोलापुरातील छत्रपती शिवाजी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुजाता जुगदार  यांना जाहीर झाला आहे.
   जागतिक मातृदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार देण्यात येत असून या पुरस्काराचे यंदाचे हे २५वे वर्ष आहे.सन्मानचिन्ह,सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचेस्वरूप आहे. येत्या रविवारी, 30 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता पुण्यातील पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथील तारांगण ऑडिटोरिअम येथे या पुरस्काराचे वितरण मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील
राजे लखोजी जाधवराव यांचे १४ वे वंशज तथा स्वराज्याचे सरसेनापती धनाजी जाधवराव"x यांचे थेट दहावे वंशज श्रीमंत संभाजीराजे जाधवराव यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ लेखिका व कवयित्री सविता जंगम (ओतूर )या राहणार असून याप्रसंगी भोसरी येथीक उद्योजक डॉ. अशोक साळुंखे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
 मुख्याध्यापिका जुगदार यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी महापौर मनोहर सपाटे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अरुण मित्रगोत्री, सोलापूर जिल्हा कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले आदींनी अभिनंदन केले आहे .


Reactions

Post a Comment

0 Comments