निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासन सज्ज..... दुबारा मतदान ४६३ मतदाराकडून हमीपत्र घेण्यात येणार.... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 29, 2025

निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासन सज्ज..... दुबारा मतदान ४६३ मतदाराकडून हमीपत्र घेण्यात येणार....

 निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासन सज्ज.....

      दुबारा मतदान ४६३ मतदाराकडून हमीपत्र घेण्यात येणार....

 मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शुक्रवार दि.२८ नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्यांना ईव्हीएम मशीन प्रशिक्षण देण्यात आले.तर उमेदवारासह उमेदवार प्रतिनिधी यांच्या साक्षीने ईव्हीएम मशीन निवडणूक निर्णय अधिकारी निलेश पाटील,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत भोसले,सुधाकर धाईंजे यांच्या उपस्थितीमध्ये सिलिंग करण्यात आल्या.

            मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी एकूण २७ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रातील मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनला उमेदवारासह उमेदवारांच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीमध्ये सिलिंग करण्यात आले.दरम्यान कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तर निवडणूक प्रचारासाठी रविवार दि.१ डिसेंबर रोजी पर्यंत संधी देण्यात आली आहे. मोहोळ शहरांमध्ये दुबारा मतदान ४६३ असून या मतदाराकडून हमीपत्र घेण्यात येणार आहे.मी याच प्रभागांमध्ये मतदान करणार आहे. काही मतदारांनी न दिल्यास प्रत्यक्ष मतदान केंद्रावर मतदान कर्त्यावेळी डबल स्टार असणाऱ्या मतदाराकडून हमीपत्र घेण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनासह पोलीस कर्मचारी सज्ज झाले आहेत. 


       यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी निलेश पाटील,सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत भोसले,सुधाकर धाईंजे, नगरपरिषद निवडणूक अधिकारी रणजीत कांबळे,दिनेश गायकवाड यांच्यासह महसूल विभागातनिवडणुकीसाठी विविध विभागातील नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

पोलीस निरीक्षक:-१

पोलीस अधिकारी:-७

पोलीस कर्मचारी :-७८

होमगार्ड-६५,

एकूण मतदार संख्या:-२४४१३

कंट्रोल युनिट:-४७

बॅलेट युनिट:-९४

 एकूण संख्या:-१४१

.प्रत्यक्ष मतदान केंद्रावर. 

कंट्रोल युनिट:-२७

बॅलेट युनिट:-५४

एकूण संख्या:-८१

 .प्रभागासाठी ईव्हीएम मशीन राखीव.

कंट्रोल युनिट:-२०

बॅलेट युनिट:-४०

एकूण संख्या:-६०,

मतदान केंद्रे एकूण संख्या:-२७,

प्रत्येक केंद्रावर अधिकारी,कर्मचारी, पोलीस कर्मचाऱ्यासह एकूण संख्या:-६,

कर्मचारी एकूण  संख्या:-१६२,

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages