रणदिवेंची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) राज्य सरचिटणीसपदी नियुक्ती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 29, 2025

रणदिवेंची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) राज्य सरचिटणीसपदी नियुक्ती

रणदिवेंची राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) राज्य सरचिटणीसपदी नियुक्ती


मोडनिंब (कटूसत्य वृत्त):- अरण (ता. माढा) येथील हरिदास रणदिवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) च्या राज्य सरचिटणीस या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी रणदिवे यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली.                                                                      गोविंदबाग, बारामती येथे आयोजित विशेष कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी स्वतः रणदिवे यांना नियुक्तीपत्र प्रदान करत नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. पक्षातील ही नियुक्ती रणदिवे यांच्या सातत्यपूर्ण कार्याची आणि पक्षनिष्ठेची दखल असल्याचे मानले जात आहे.                       
                  नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना रणदिवे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि ध्येयधोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवणे हेच माझे प्राधान्य राहील. गावोगावी पक्ष अधिक बळकट करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करणार आहे.”    रणदिवे यांच्या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी अभिनंदन व्यक्त केले आहे. यामध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, माढ्याचे आमदार अभिजित पाटील, जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख, कार्याध्यक्ष रवींद्र पाटील बोरगावकर, तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, तसेच भारत आबा शिंदे यांचा समावेश आहे.
या नियुक्तीमुळे सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या संघटन बांधणीला नवीन ऊर्जा मिळेल, असा विश्वास पक्षातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages