यंदा प्रभाग ५ मध्ये शिवसेना उबाठा पक्षाची मशाल विजयातून तळपणार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 29, 2025

यंदा प्रभाग ५ मध्ये शिवसेना उबाठा पक्षाची मशाल विजयातून तळपणार

 यंदा प्रभाग ५ मध्ये शिवसेना उबाठा पक्षाची मशाल विजयातून तळपणार




शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार गणेश क्षीरसागर आणि सपना क्षीरसागर यांच्या विजयासाठी पक्षश्रेष्ठींचे बेरजेचे राजकारण

रखडलेला विकास आणि प्रभागवासीयांच्या सन्मानासाठी शिवसेनेच्या मशालीला विजयी करण्याचे गणेश क्षीरसागर यांचे प्रचारातून आवाहन



मोहोळ (कटूसत्य वृत्त):-
प्रभाग क्रमांक ५ मधील विकासाचे रखडलेले प्रश्न, सर्वसामान्यांच्या मनामध्ये यापूर्वीच्या सत्ताधाऱ्याबद्दल असली नाराजी आणि शिवसेना उबाठा पक्षाला मानणारा मोठा वर्ग यांचा उत्तम समन्वय साधत या प्रभागातून विजय मिळवण्याचा निर्धार या प्रभागातील शिवसेना उबाठा पक्षाचे मशाल चिन्हाचे उमेदवार गणेश नवनाथ क्षीरसागर यांनी केला आहे.शिवसेना नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी सपना दादाराव क्षीरसागर यांच्याही विजयासाठी संपूर्ण पक्षाची रणनीती प्रभागात राबवली असून या दोन्ही उमेदवारांचा विजय आता या ठिकाणाहून निश्चित मानला जात आहे. गणेश क्षीरसागर हे जुन्या काळापासून शिवसेनेमध्ये सक्रिय असलेले युवा नेते असून त्यांना मानणारा मोठा वर्ग या प्रभागात आहे. या प्रभागातील प्रत्येक सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाण्याची भूमिका असलेले गणेश यापूर्वीपासूनच लोकप्रिय युवा नेते म्हणून परिचित आहेत. त्याचा मोठा फायदा या निवडणुकीत त्यांना विजय मिळवण्यासाठी होताना दिसून येत आहे. गणेश क्षीरसागर यांच्या विजयासाठी ज्येष्ठ नेते दीपक गायकवाड, महिला आघाडीचे नेते सीमाताई पाटील त्याचबरोबर शिवसेनेचे या प्रभागातील लढवय्ये नेतेमंडळी सातत्याने प्रयत्नशील असून गणेश क्षीरसागर यांनी पदयात्रा आणि कॉर्नर बैठकावर मोठ्या प्रमाणात भर देत मतदारांशी संवाद वाढवला आहे.

चौकट
मोहोळ शहराच्या चारही दिशेला शिवसेना उबाठा पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. शिवसेना पक्षाने प्रभाग क्रमांक पाच मध्ये गणेश क्षीरसागर आणि सपना क्षीरसागर या दोन उमेदवारांना दोन्ही प्रभागातून संधी देत बेरजेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रभागातील अन्य पक्षांची दबाव प्रचार यंत्रणा आणि मतदारांची दिशाभूल करण्याचा होणारा प्रयत्न या बाबींना छेद देत गणेश क्षीरसागर यांनी शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी प्रचार यंत्रणा सक्रिय ठेवली आहे. एक मनमिळाऊ आणि धडपडी व्यक्तिमत्व म्हणून परिचित असलेल्या गणेश क्षीरसागर यांना विजयी करण्यासाठी प्रभागातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिक प्रयत्नशील आहे. या प्रभागातील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक देखील निरपेक्ष भावनेने मन लावून प्रचारात उतरत त्यांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करताना दिसत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages