प्रभाग १० मध्ये शिवसेना शिंदे पक्षाने प्रमुख मान्यवरांच्या बैठकानंतर देशमुख परिवाराचा . डोअर टू डोअर प्रचारावर भर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, November 29, 2025

प्रभाग १० मध्ये शिवसेना शिंदे पक्षाने प्रमुख मान्यवरांच्या बैठकानंतर देशमुख परिवाराचा . डोअर टू डोअर प्रचारावर भर

 प्रभाग १० मध्ये शिवसेना शिंदे पक्षाने प्रमुख मान्यवरांच्या बैठकानंतर देशमुख परिवाराचा . डोअर टू डोअर प्रचारावर भर



 
शिवसेना शिंदे पक्षाचे प्रभाग 10 मधील उमेदवार चैतन्य देशमुख यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठकांना प्रतिसाद

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-

मोहोळ शहरातील प्रभाग क्रमांक दहा मधील शिवसेना शिंदे पक्षाची ताकद निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आता आणखी वाढताना दिसत आहे. ज्येष्ठ नेते पद्माकर अप्पा देशमुख यांनी त्यांचे सुपुत्र तथा युवा उद्योजक चैतन्य बापू देशमुख यांच्या उमेदवारीच्या रूपाने मोहोळ शहराच्या नगरपरिषद निवडणुकीतील राजकीय अस्तित्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. चैतन्य देशमुख यांनी शिवसेना शिंदे पक्षाकडून उमेदवारी खेचून घेतल्यापासून या प्रभागातील जनसंपर्कमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ तर केलीच मात्र प्रत्येक प्रभागातील प्रत्येक वाडी वस्त्यावर जाऊन तेथील रस्ते पाणी आरोग्य विषयक समस्या जाणून घेतल्या. 

सर्वसामान्य नागरिक त्यांची विकासाबद्दलची तळमळ आणि राजकीय पदार्पण आणि केवळ सेवाभावी धोरणाने ठेवलेले पाऊल पाहून त्यांना धनुष्यबाण चिन्हावर विजयरुपी शुभेच्छा देताना दिसत आहेत. प्रभागातील काही प्रमाणात रखडलेले प्रश्न बारकाईने जाणून घेत त्याबाबत ठोस निर्णय घेऊन सर्वांना सत्तेच्या माध्यमातून विकासकामे खेचून आणून शब्द पूर्ण करण्याची हमी उमेदवार चैतन्य देशमुख यांनी दिली दिली.

चौकट
प्रभागाचा शहरी भागाचा समावेश असलेल्या विद्यानगर, बागवान नगर, अहिल्यानगर गरड महाविद्यालय परिसर, गवळी प्लॉटिंग, सुभाष नगर, गणेश नगर, बरेनगर, तक्षशिला सोसायटी चंद्रलोक पार्क मंदाकिनी रेसिडेन्सी या परिसरातील नागरिकांशी थेट संपर्क साधत पद्माकर अप्पा देशमुख यांनी उमेदवार असलेले चैतन्य बापू देशमुख यांच्या समवेत प्रभाग बैठका जनसंवाद दौरा आणि कॉर्नर बैठकावर भर देत डोअर टू डोअर प्रचाराचाही प्रभावी अवलंब केला आहे. देशमुख परिवारातील युवा नेते प्रसाद देशमुख व प्रत्येक सदस्य प्रचारात सहभागी झाल्यामुळे या प्रचारातील शिवसेना शिंदे पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages