Hot Posts

6/recent/ticker-posts

महिला आरक्षणाने मातब्बरांची समीकरणे बिघडली — पर्यायी प्रभागांकडे मोर्चा

 महिला आरक्षणाने मातब्बरांची समीकरणे बिघडली — पर्यायी प्रभागांकडे मोर्चा





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर प्रशासनाने महिला व इतर प्रवर्गांच्या आरक्षणाची सोडत काढली. या आरक्षण सोडतीने काही ‘मातब्बर’ नगरसेवक आणि इच्छुकांचे समीकरणच बिघडवले आहे. आपल्या परंपरागत प्रभागात लढण्याचा मार्ग बंद झाल्याने आता हे मातब्बर ‘पर्यायी’ प्रभागांच्या शोधात सक्रिय झाले आहेत. या नव्या राजकीय हालचालींमुळे शहरातील निवडणूक समीकरणे नव्याने रंग घेऊ लागली आहेत.

राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार पुन्हा गती मिळाल्याने, सन २०११ च्या लोकसंख्येवर आणि सन २०१७ च्या प्रभाग रचनेवर आधारित आरक्षण सोडती जाहीर झाली. सोलापूरमध्ये झालेल्या या सोडतीत महिला आरक्षणाचा फटका अनेक दिग्गजांना बसला आहे. काही प्रभागांमध्ये महिलांसाठी राखीव जागा पडल्याने अनेक विद्यमान नगरसेवकांना पर्यायी पर्याय शोधावा लागत आहे.

महिला आरक्षणामुळे ३४ प्रभागांमध्ये आरक्षणात बदल झाला आहे.
उदा.-प्रभाग ३ : ओबीसी (महिला) प्रवर्ग राखीव झाल्याने सुरेश पाटील यांना अडचण.
प्रभाग ५ : गणेश पुजारी यांना बदल करावा लागणार.
प्रभाग ६ : अनुसूचित जाती (महिला) प्रवर्ग राखीव, त्यामुळे मनोज शेजवाल अडचणीत.
प्रभाग ८, ११, १४, १६, १९, २०, २१, २२, २४, २५ अशा अनेक प्रभागांत मातब्बरांना जागा बदलावी लागणार आहे.

या बदलामुळे काहींनी शेजारच्या प्रभागात प्रवेश करण्याची हालचाल सुरू केली आहे. मात्र त्या प्रभागात आधीपासूनच इच्छुकांची गर्दी असल्याने स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे. आता विविध राजकीय गणिते, गटबाजी आणि आघाड्यांच्या चर्चांमुळे सोलापूरच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल लागली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments