Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रा. वैशाली निंबाळकर यांना भूगोलशास्त्रातून पीएच.डी. पदवी

 प्रा. वैशाली निंबाळकर यांना भूगोलशास्त्रातून पीएच.डी. पदवी




बार्शी (कटूसत्य वृत्त) :– बार्शी येथील प्रा. वैशाली निंबाळकर यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या स्कूल ऑफ अर्थ सायन्सेस अंतर्गत भूगोलशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या संशोधन प्रबंधाचा विषय होता “The Study of Rainfall Variation on Crop Distribution and Crop Productivity in Solapur District: A Geographical Perspective.”

या प्रबंधाद्वारे प्रा. निंबाळकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील पर्जन्यमानातील बदलांचा शेतीतील पिकांच्या वितरणावर आणि उत्पादनक्षमतेवर होणारा परिणाम याचा सखोल अभ्यास केला आहे. हवामान बदल आणि शेती यांचा परस्पर संबंध भूगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून उलगडून दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न विशेष उल्लेखनीय ठरला आहे.

या संशोधन कार्यासाठी त्यांना प्रा. डॉ. गुणवंत सरवदे यांचे मार्गदर्शन लाभले, तर श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालयाच्या संचालिका सौ. वर्षा ठोंबरे यांनी त्यांना संशोधनासाठी सातत्याने प्रोत्साहन दिले.या यशाबद्दल प्रा. वैशाली निंबाळकर यांचे शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments