Hot Posts

6/recent/ticker-posts

नातेपुते येथील एस एन डी स्कूलचा विद्यार्थी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय

 नातेपुते येथील एस एन डी स्कूलचा विद्यार्थी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय



 नातेपुते (कटूसत्य वृत्त):- 

राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नातेपुते येथील एस. एन. डी. इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचा इयत्ता सातवी मधील विद्यार्थी राजवर्धन जयंत चिंचकर याने द्वितीय क्रमांक पटकाविला.

सदर स्पर्धा ह्या ज्ञान कला क्रीडा व कृषी प्रतिष्ठान फडतरे नॉलेज सिटी कळंब जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेसाठी पुणे सोलापूर सातारा या जिल्ह्यातून विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये राजवर्धन चिंचकर याने महाराष्ट्रातील संत परंपरा एक अमूल्य ठेवा हा विषय राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत निवडून आपला भाषणातून परीक्षकाचे व समोर बसलेल्या सर्व त्यांची मने जिंकून हर्षवर्धन चिंचकर याने स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळविला. त्याला प्रमाणपत्र ट्रॉफी व रोख रक्कम १५०० रुपये बक्षीस फडतरे नॉलेज सिटी चे संस्थापक अध्यक्ष उत्तम फरतडे यांच्या शुभहस्ते देण्यात आले. राजवर्धन चिंचकर याने वक्तृत्व स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल एस. एन. डी. इंटरनॅशनल सीबीएसई स्कूलचे चेअरमन मालोजीराजे देशमुख, महेश शेटे स्वदेश दोशी, यांनी शाळा प्रशासनाच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी प्राचार्य संदीप पानसरे उपप्राचार्य शकूर पटेल पीआरओ मनोज राऊत, शिक्षक सुदर्शन सुतार सुरज ननावरे उपस्थित होते.


फोटो ओळी :
राजवर्धन चिंचकर यांचा सन्मान करताना मालोजीराजे देशमुख महेश शेटे व इतर

Reactions

Post a Comment

0 Comments