Hot Posts

6/recent/ticker-posts

महात्मा फुले विद्यालय, टेंभुर्णी ची विद्यार्थिनी एंजल कोकरे शालेय आर्चरी स्पर्धेत भारत देशात दुसरी

 महात्मा फुले विद्यालय, टेंभुर्णी ची विद्यार्थिनी एंजल कोकरे शालेय आर्चरी स्पर्धेत भारत देशात दुसरी





टेंभुर्णी(कटूसत्य वृत्त):- 
   वाराणसी उत्तर प्रदेश येथे संपन्न झालेल्या 69 व्या राष्ट्रीय शालेय धनुर्विद्या (आर्चरी) स्पर्धेत रिकर्व्ह राऊंड या प्रकारामध्ये टेंभुर्णी येथील महात्मा फुले विद्यालयाची विद्यार्थिनी कु.एंजल सुनील कोकरे ही इयत्ता सातवी ची विद्यार्थिनी भारत देशात दुसरी आली आहे.या या 14 वर्षे वयोगटाच्या स्पर्धेत तिने अतिशय चमकदार अशी कामगिरी करत रौप्य (रजत) पदक पटकाविले.वाराणसी येथील स्पर्धेत संपूर्ण भारत देशातील जवळपास 1200 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता.त्या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण 13 पदके मिळवून देशात महाराष्ट्र राज्य अव्वल ठरले आहे. यापूर्वी यवतमाळ येथे झालेल्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत याच विद्यालयाची विद्यार्थिनी एंजल कोकरे ही महाराष्ट्रातून सर्वप्रथम आली होती.तिने मिळवलेले हे यश टेंभुर्णीकरांसाठी अभिमानास्पद आहे.तिला सह्याद्री आर्चरी अकॅडमी, टेंभुर्णी चे श्री.सागर सावंत सर व या विद्यार्थिनीचे पालक श्री.सुनील विठ्ठल कोकरे यांचे मार्गदर्शन लाभले.तिच्या या यशाबद्दल माजी आमदार श्री.बबनरावजी शिंदे तसेच आमदार श्री.अभिजीत आबा पाटील, जिल्हा दूध संघाचे चेअरमन श्री.रणजीतसिंह शिंदे, टेंभुर्णीचे माजी सरपंच श्री.प्रमोद कुटे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.नारायण भानवसे सर, विद्यालयाचे प्राचार्य श्री.विजय यादव सर, मुख्याध्यापक श्री.शोएब बागवान सर,क्रिडा शिक्षक श्री शरद सातव सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी व पालकांनी तिचे अभिनंदन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments