मॉडर्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज भोसे येथे संविधान दिन साजरा..
भोसे (कटूसत्य वृत्तसेवा) मॉडर्न पब्लिक स्कूल भोसे व जूनियर
कॉलेज मध्ये संविधान दिनानिमित्तद मुलांच्या कडून संविधानाचे वाचन करण्यात आले. मुलांनी भारताचे संविधान या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरही विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले. प्रशाले मधील शिक्षिका पुणवंती मोरे यांनी संविधान वाचून दाखवत संविधान विषयी माहिती सांगितली व एक कविता सादर केली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष माने संचालिका अनिता माने व प्रशाले मधील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अशा प्रकारे अतिशय उत्साहात आजचा हा संविधान दिन साजरा झाला.

0 Comments