अशोक कामटे संघटना आयोजित शहिदांच्या स्मरणार्थ 119 रक्तदात्यांनी केले रक्तदान
रक्तदान हेच खरे श्रेष्ठदान:– सपोनि चेतन थोरबोले
सांगोला (प्रतिनिधी)
सांगोल्यातील शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीने मुंबई हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ आयोजित 17 वे रक्तदान शिबिरात 119 जणांनी रक्तदान केले.
शहीद अशोक कामटे सामाजिक संघटना आयोजित रक्तदान शिबिराचा शुभारंभ कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद घाटे साहेब व सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले, रमेश जाधव, अमोल शिवशरण, डॉ शैलेश डोंबे, नवनाथ शिंदे सर यांच्या हस्ते करण्यात आले . संविधान दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सर्व शहिदांच्या प्रतिमेचे पूजन सांगोला रेल्वे स्टेशनचे अधीक्षक गंगाकुमार सिंह , माजी सैनिक कल्याणकारी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य,ॲड गजानन भाकरे, एचडीएफसी बँकेचे शाखाधिकारी प्रितेश मंथळकर ,ॲड मारुती ढाळे,राजेंद्र यादव अध्यक्ष आपुलकी प्रतिष्ठान, सुहास देशमुख (पंढरपूर ग्रामीण पोलीस),यशवंत दिघे, राजू बंडगर, (अंध व्यक्ती)विशाल सरवदे,संदीप कोळवले,यांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करण्यात आले .
या शिबिरात 119 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
भारतीय संस्कृती नेहमीच सर्व प्रकारच्या दान व ज्ञानाची संस्कृती राहिलेली आहे .आपल्या रक्तदानाने आपण एखाद्या माणसाचा जीव वाचवू
शकतो यासारखे दुसरे पुण्य नाही म्हणून सर्वांनी रक्तदान करणे हीच शहीदाना श्रद्धांजली व समाजसेवा असून रक्तदान हे खरे श्रेष्ठ दान असल्याचे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ॲड गजानन भाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. शहीद अशोक कामटे संघटनेचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवउद्गार ॲड भाकरे यांनी व्यक्त केले.
सर्वात पुण्याचे काम म्हणजे रक्तदान आहे त्यासाठी संघटनेच्या सर्व युवकांनी या पवित्र कार्यास सामील होऊन देशसेवा करावी असे मार्गदर्शनपर विचार सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोले साहेब यांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
शहीद दिनाच्या कार्यक्रमाप्रसंगी दिवसभरात सांगोला शहर व तालुक्यातील माजी सैनिक,नागरीक, व्यापारी, पत्रकार व विविध सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी यांनी शिबिरात सहभागी होऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
रक्त संकलनाच्या कार्यासाठी रेवनील ब्लड बँक सांगोला येथील सर्व कर्मचाऱ्यांनी रक्त संकलनाचे कार्य केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघटनेचे मकरंद पाटील, मयूर ढोले,ॲड हर्षवर्धन चव्हाण,मुकुंद हजारे, शारिक तांबोळी, विठ्ठलपंत शिंदे सर, तेजस कुरकुटे, अतुल बनसोडे,तोसिफ शेख , प्रा प्रसाद खडतरे , देवराज पोळ, धनाजी शिर्के, रविंद्र कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार निलकंठ शिंदे सर व सूत्रसंचालन संतोष कुंभार सर यांनी केले.


0 Comments