पीसीसीओइआर च्या मुलींची आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी
लेखा कोतवाल व श्रावणी जगताप यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
पिंपरी, पुणे (कटूसत्य वृत्त):-पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च येथील मुलींच्या संघाने इंटर कॉलेज बॉल बॅडमिंटन (मुली) स्पर्धा या विभागीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत द्वितीय क्रमांक मिळवला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिसर्च यांच्या वतीने रावेत येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन (मुली) स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत अंतिम सामन्यात हडपसर येथील एस. एम. जोशी महाविद्यालयाने पीसीसीओईआर च्या संघास पहिल्या फेरीत ३५ - २३ आणि दुसऱ्या फेरीत ३५ - २० असा सरळ सेट मध्ये पराभव करून प्रथम क्रमांक मिळविला. सेमी फायनल सामन्यात पीसीसीओईआर संघाने हडपसर येथील ए. एम. महाविद्यालय संघावर प्रथम फेरीत ३५ - २४, द्वितीय फेरीत १६ - ३५, तर तृतीय फेरीत ३५ - २५ गुणांनी विजय मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला.
पीसीसीओईआर संघातील लेखा कोतवाल आणि श्रावणी जगताप यांची पुणे विभागीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघात निवड झाली. द्वितीय क्रमांक प्राप्त पीसीसीओईआर संघात कल्याणी कोळपे, मन्हा मुलानी, सृष्टी पाटील, भार्गवी काळभोर, वैष्णवी जगताप, मनस्वी रणखांब, वैष्णवी कल्याणकर, ज्ञानेश्वरी वर्पे या विद्यार्थिनींचाही समावेश होता.
स्पर्धेचे आयोजनात शारीरिक शिक्षण संचालक मिलिंद थोरात, पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव डॉ. अमेय काळे, प्रा. ऋषिकेश कुंभार, प्रा. अमोल आहेर, प्रा. राजेंद्र लांडगे यांनी सहभाग घेतला.
पीसीसीओईआरचे संचालक डॉ. हरीश तिवारी, आर. अँड डी. विभाग प्रमुख डॉ. सुदर्शन बोबडे, पीसीसीओई क्रीडा संचालक प्रा. संतोष पाचारणे यांनी मार्गदर्शन केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजयी संघाचे अभिनंदन करून लेखा कोतवाल व श्रावणी जगताप यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.


0 Comments