Hot Posts

6/recent/ticker-posts

बाळेत सुरू झाला एसटी तिकीट पॉईंट; प्रवाशांना दिलासा

 बाळेत सुरू झाला एसटी तिकीट पॉईंट; प्रवाशांना दिलासा
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बाळे परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत परिवहन महामंडळाने येथे एसटी तिकिटासाठी वाहक पॉईंट सुरू केला आहे. यामुळे बाळेतील प्रवाशांना तिकीटासाठी शहरातील मुख्य बसस्थानकापर्यंत यावे लागणार नाही. वेळ आणि पैशांची बचत होणार असल्याचे मत परिवहन महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक अमोल गोंजारी यांनी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
बाळे चौकात नव्याने सुरू करण्यात आलेल्या वाहक पॉईंटचे उद्घाटन विभागीय व्यवस्थापक अमोल गोंजारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आगार प्रमुख उत्तम जोंधळे, आगार व्यवस्थापक नागेश जाधव, स्थानक प्रमुख मल्लिकार्जून अंजुटगी, सहायक वाहतूक अधीक्षिका उमा गव्हाणे, वाहतूक निरीक्षक बाळासाहेब वाघमारे, विभागीय वाहतूक अधिकारी परशुराम नकाते, विभागीय अभियंता चौधरी, यंत्रचालन अधिकारी शीतल बिराजदार यांच्यासह परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गोंजारी म्हणाले की, बाळे हा शहराचा वेगाने विकसित होणारा परिसर असून येथे लहान-मोठ्या उद्योगांची संख्या मोठी आहे. या भागातील सामान्य प्रवाशांच्या सोयीसाठी दोन पाळीत वाहकांची नियुक्ती करण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या तसेच नियमित धावणाऱ्या बसेसचे तिकीटही आता याच ठिकाणी मिळणार असल्याने प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments