Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री विठ्ठल कारखान्यावर कै. यशवंतरावजी चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी

 श्री विठ्ठल कारखान्यावर कै. यशवंतरावजी चव्हाण यांची पुण्यतिथी साजरी




वेणुनगर, (कटूसत्य वृत्त):- वेणुनगर - गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना येथे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार व धुरंधर राष्ट्रीय नेते भारताचे माजी उपपंतप्रधान कै. यशवंतराव चव्हाण यांच्या ४१ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे पुर्णाकृती पुतळ्याची विधीपुर्वक पुजा जेष्ठ संचालक श्री दिनकर आदिनाथ चव्हाण यांचे शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन, आमदार अभिजीत (आबा) पाटील व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
कै.यशवंतराव चव्हाण यांचा श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याचे उभारणीमध्ये सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या या प्रयत्नास यश येवून गुरसाळे येथील माळरानावरती श्री विठ्ठल कारखान्याची मुहुर्तमेढ रोवून पंढरपूर तालुक्यात कृषी व औद्योगिक क्रांती घडवून आणली. कै. यशवंतराव चव्हाण साहेब हे दुरदर्शी नेतृत्व व प्रगल्भ विचारसरणी आणि विकासाला आयुष्य समर्पित करणारे, महाराष्ट्राचे सामाजीक, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणीक आणि औद्योगिक क्षेत्रात परिवर्तनाची नवी दिशा देणारे दुरदृष्टी विचार होते. आधुनिक महाराष्ट्राची भक्कम पायाभरणी करणारे राज्याचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवरावजी चव्हाण होते. महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न हीच त्यांची खरी ओळख आहे.
सदर कार्यक्रमास कारखान्याचे संचालक सर्वश्री धनंजय काळे, दत्तात्रय नरसाळे, अशोक तोंडले, सचिन पाटील, गणेश ननवरे, कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड, तसेच कारखान्याचे सभासद, कार्यकर्ते, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार, सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व संचालक व मान्यवरांनी याप्रसंगी कै. यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहून विनम्र अभिवादन केले.

Reactions

Post a Comment

0 Comments