दशकपूर्ती कार्यक्रमात श्रीमंतयोगी प्रतिष्ठानचा सेवाभाव उजळला
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या दशकपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात गरजू विद्यार्थ्यांना मायेची ऊब देणारी मदत करण्यात आली. या प्रसंगी बी.सी. बॉईज असोसिएशनचे सचिव अॅड. मीरा प्रसाद सिंग, सहायक लेखाधिकारी सूर्यकांत तोडकरी, तसेच होस्टेलचे व्यवस्थापक शंकर म्हमाणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी दशकभरातील उपक्रमांचा आढावा घेत उपस्थितांचे मनापासून स्वागत केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष अलकुंटे, महेश ढेंगळे, प्रकाश आलंगे, दीपक करकी, गणेश माने, श्लोक सक्करगी, सौरभ लकडे, श्रीरंग रेगोटी, अभिजित व्हनकळस, अक्षता कासट, मनुश्री कासट, श्रेया लंचके, श्रीनिधी जाधव, शीला तापडिया, शुभांगी लंचके, सुजाता सक्करगी, अर्चना बंडगर, प्रियंका जाधव आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नर्मदा कनकी यांनी केले, तर आभार प्रदर्शन विक्रम बायस यांनी मानले. उपस्थित मान्यवरांनी प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे कौतुक करत आगामी काळातही अशाच सेवा उपक्रमांची अपेक्षा व्यक्त केली.

0 Comments