Hot Posts

6/recent/ticker-posts

राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर

 राष्ट्रवादीचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने  सोलापूर शहर - जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहर जिल्ह्याचे नूतन सहसंपर्क मंत्री तथा विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे  हे २७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान असे तीन दिवस सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी पत्रकार परिषदेत दिली.
           या तीन दिवसांमध्ये प्रभाग बैठका, पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, विविध विकास कामांचा शुभारंभ, गप्पागोष्टी, तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेशाचा सोहळा कार्यक्रम पार पडणार आहेत.
राष्ट्रवादीचे सहसंपर्कप्रमुख अण्णा बनसोडे यांचे गुरुवार २७ नोव्हेंबर रोजी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाल्यानंतर तेथेच दुपारी २ वाजता सर्वप्रथम पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी अडीच वाजता प्रभाग क्रमांक १५ आणि १६ येथे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३.५० वाजता रोजंदारी कामगारांना कायम करण्यासंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे बैठक होणार आहे.त्यानंतर दुपारी ४.१० वाजता जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनमध्ये अण्णा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात विविध पक्षातील प्रमुखांचा पक्ष प्रवेश होणार आहे.  सायंकाळी ५ वाजता मिलिंद नगर बुधवार पेठ येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार येथे पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे व माजी उपमहापौर विष्णू निकंबे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
        दुपारी साडेपाच वाजता न्यू बुधवार पेठेतील चंद्रकांत सोनवणे यांच्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांशी गाठीभेटी होऊन सायंकाळी ६ वाजता न्यू बुधवार पेठेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या समोरील रस्त्यावर प्रभाग क्रमांक १, २ आणि ३ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत.
रात्री सात वाजता प्रभाग क्रमांक ६ व ७ मधील धरमसी लाईन येथे बैठक होणार असून त्यानंतर विविध विकास कामाचे भूमिपूजन आणि उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर रात्री ८ वाजता प्रभाग १४ मधील विजापूर वेस येथे चौकाच्या सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ अण्णा बनसोडे यांच्या हस्ते पार पडणार आहे.राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. रात्री ९ वाजता बाळीवेसेतील कसबा गणपती येथे अण्णा बनसोडे हे गणपतीचे दर्शन घेऊन आरती करणार आहेत. त्यानंतर आनंद मुस्तारे यांच्या निवासस्थानी ते भेट देणार आहेत. रात्री साडेनऊ वाजता शासकीय विश्रामगृह येथे अण्णा बनसोडे हे थांबणार आहेत.
   शुक्रवार दि. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता सह संपर्क मंत्री अण्णा बनसोडे यांच्या दुसऱ्या दिवसाच्या दौऱ्याला दमानी नगर येथून सुरुवात होणार आहे. दरम्यान, तीन दिवसात ते शहरातील विविध पदाधिकारी यांच्या भेटीगाठी, नागरिकांशी संवाद, बैठका, विकास कामांचा शुभारंभ होणार आहे. इतर कार्यक्रम होणार आहेत, असे
  शहर- जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान जेष्ठ नेते सुधीर खरटमल प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव,आनंद चंदनशिवे आणि राष्ट्रवादीचे नेते तौफीक शेख यांनी सांगितले.
       या पत्रकार परिषदेला प्रदेश सरचिटणीस आनंद मुस्तारे,सचिव इरफान शेख,महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर, माजी नगरसेविका नूतन गायकवाड, नजीब शेख,चाचा सोनवणे, गणेश पुजारी, वैभव गंगणे, रुपेशकुमार भोसले, अमीर शेख, भास्कर आडकी,सुरेखा घाडगे, दत्तात्रय बनसोडे,श्रीकांत वाघमारे आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments