Hot Posts

6/recent/ticker-posts

मोहोळमध्ये भाजप उमेदवार शीतल क्षीरसागर यांची जनसंपर्क पदयात्रा वेगात

 मोहोळमध्ये भाजप उमेदवार शीतल क्षीरसागर यांची जनसंपर्क पदयात्रा वेगात
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शीतल सुशील क्षीरसागर यांनी मोहोळ शहरात प्रभावी जनसंपर्क मोहीम आणि पदयात्रा सुरू केली आहे. शहरातील विविध भागांत भेटी देत त्या मतदारांशी संवाद साधत असून, “सामाजिक ऐक्य व सर्वांगीण विकासाचे व्हिजन” मतदारांसमोर मांडत आहेत.
नगराध्यक्षपदासाठी अकरा उमेदवार रिंगणात असले तरी प्रत्यक्ष लढत भाजप, शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात रंगणार असल्याचे राजकीय चित्र आहे. शहरातील मराठा, मुस्लीम, नवबौद्ध, मातंग, धनगर, माळी, लिंगायत आदी समाजाचे मतदान निर्णायक ठरणार असून लहान समाजांचे मतदानही निकालावर परिणाम करणारे ठरणार आहे.
भाजपने मुस्लीम समाजातील पाच उमेदवारांना नगरसेवकपदासाठी उमेदवारी देत विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. शहरातील ज्येष्ठ नेते शहाजहान शेख मालक, खाजाभाई शेख, डॉ. नसीर खान, अस्लम खान, बिलालभाई शेख, मुश्ताक शेख, शकीलभाई शेख, मुजीब मुजावर, हकीम तलफदार, इम्रान बागवान, अंनिस कुरेशी, मकबुल बागवान, माजीद शेख, हमीद मुजावर आदींसह भाजपचे प्रचार प्रमुख आणि समन्वयक सोमेश क्षीरसागर, तालुकाध्यक्ष सतीश काळे तसेच अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी शीतल क्षीरसागर यांना उघड पाठिंबा दर्शवला आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments