Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर महापालिकेचे आरक्षण जाहीर; काहींसाठी सुवर्णसंधी, तर काहींसाठी धक्का!

सोलापूर महापालिकेचे आरक्षण जाहीर; काहींसाठी सुवर्णसंधी, तर काहींसाठी धक्का!



- आरक्षण सोडतीने सोलापूरात राजकीय गणिते बदलली!
- काहींचं स्वप्न पूर्ण, काहींचा प्रभाग गेला – ‘आरक्षण’ची उलथापालथ
- २६ प्रभागांसाठी आरक्षण जाहीर; महिला व ओबीसींचा वाढलेला वाटा
- सोलापूरात आरक्षण सोडती पार पडली; राजकीय पक्षांची धावपळ सुरू
- आरक्षणाने ठरवले सोलापूरचे राजकीय भविष्य!

सोलापूर (कटूसत्य वृत):- सोलापूर महानगरपालिकेचे बहुप्रतिक्षित आरक्षण जाहीर झाले असून यामुळे अनेक इच्छुकांची ‘कहीं खुशी कहीं गम’अशी अवस्था झाली. महानगरपालिका आरक्षणावरच आगामी राजकीय समीकरणे अवलंबून असल्याने इच्छुकांचे लक्ष आरक्षणाकडे लागले होते. आगामी सार्वत्रिक महानगरपालिका निवडणुकांसाठी शहरातील सर्व प्रभागातील आरक्षण निश्चित करण्यात आले. यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी या आरक्षणांबरोबर महिलांच्या आरक्षणांचा समावेश आहे.

हुतात्मा स्मृती मंदिरात सकाळी ११ वाजता लॉटरी सोडत तसेच आयोगाचे दिशानिर्देशद्वारे हे आरक्षण निश्चित करण्यात आले. यावेळी नागरिक उपस्थित होते. पालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली. आरक्षण सोडती वेळी इच्छुकांचे अनेक प्रभाग महिला किंवा जातनिहाय आरक्षणामध्ये अडकले गेले. विशेषतः खुल्या गटातून निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांना आलेलं आरक्षण आपल्यावर राजकीय गंडांतर आल्याचं वाटू लागलं आहे. त्यामुळे अनेकांवर नवे प्रभाग शोधण्याची वेळ आली आहे.

सोलापूर महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी एकूण २६ प्रभागांमध्ये १०२ सदस्य निवडायचे आहेत. यातील १५ जागा अनुसूचित जातीसाठी आहेत. त्यातील ८ महिलांसाठी, अनुसूचित जमातीसाठी २ जागा असून यातील १ महिलांसाठी, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी २७ जागा आरक्षित असून यातील१४ महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. सर्वसाधारण गटामध्ये ५८ जागा असून यातील २८ जागा या महिलांसाठी राखीव झाल्या. आरक्षणासह महिलांसाठी एकूण ५१ जागा आरक्षित झाल्या आहेत. सोलापूर महानगर पालिकेच्या एकूण २६ प्रभागापैकी १ ते २४ प्रभाग हे चार सदस्य आहेत तर २५ आणि २६ क्रमांक हे प्रभाग तीन सदस्य आहेत. महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला असून बैठकांमधून रणनीती ठरवण्यात येत आहे.

- चौकट करून लावणे-


प्रभागनिहाय पडलेले आरक्षण

प्रभाग १ – १अ अनुसूचित जाती, १ब नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, १ क सर्वसाधारण महिला, १ ड सर्वसाधारण.

प्रभाग २ –  २ अ अनुसूचित जाती, २ ब नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, २ क सर्वसाधारण महिला, २ ड सर्वसाधारण.

प्रभाग ३ – ३ अ नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, ३ ब सर्वसाधारण महिला, ३ क सर्वसाधारण, ३ ड सर्वसाधारण.

प्रभाग ४ – ४ अ अनुसूचित जाती महिला, ४ ब नागरीकांचा मागास प्रवर्ग, ४ क सर्वसाधारण महिला, ४ ड सर्वसाधारण.

प्रभाग ५ – ५ अ अनुसूचित जाती, ५ व नागरीकांचा मागासप्रवर्ग महिला, ५ क सर्वसाधारण महिला, ५ ड सर्वसाधारण.

प्रभाग ६ – ६ अ अनुसूचित जाती महिला, ६ ब नागरीकांचा मागास प्रवर्ग, ६ क सर्वसाधारण महिला, ६ ड सर्वसाधारण.

प्रभाग ७ – ७ अ नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, ७ ब सर्वसाधारणमहिला, ७ क सर्वसाधारण, ७ ड सर्वसाधारण.

प्रभाग ८ – ८ अ नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, ८ ब सर्वसाधारण महिला, ८ क सर्वसाधारण, ८ ड सर्वसाधारण.

प्रभाग ९ – ९ अ नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, ९ ब सर्वसाधारण महिला, ९ क सर्वसाधारण, ९ ड सर्वसाधारण.

प्रभाग १० – १० अ नागरीकांचा मागास प्रवर्ग, १० ब सर्वसाधारण महिला, १० क सर्वसाधारण महिला, १० ड सर्वसाधारण.

प्रभाग ११ –  ११ अ नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, ११ ब सर्वसाधारण महिला, ११ क सर्वसाधारण, ११ ड सर्वसाधारण.

प्रभाग १२ – १२ अ नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, १२ बसर्वसाधारण महिला, १२ क सर्वसाधारण, १२ ड सर्वसाधारण.

प्रभाग १३ – १३ अ अनुसूचित जाती महिला, १३ ब नागरीकांचा मागास प्रवर्ग, १३ क सर्वसाधारण महिला, १३ ड सर्वसाधारण.

प्रभाग १४ – १४ अ नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, १४ ब नागरीकांचा मागास प्रवर्ग, १४ क सर्वसाधारण महिला, १४ ड सर्वसाधारण.

प्रभाग १५ – १५ अ अनुसूचित जाती महिला, १५ ब नागरीकांचा मागास प्रवर्ग, १५ क सर्वसाधारण महिला, १५ ड सर्वसाधारण.

प्रभाग १६ – १६ अ अनुसूचित जाती, १६ ब नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, १६ क सर्वसाधारण महिला, १६ ड सर्वसाधारण.

प्रभाग १७ – १७ अ अनुसूचित जाती महिला, १७ ब नागरीकांचा मागास प्रवर्ग, १७ क सर्वसाधारण महिला, १७ ड सर्वसाधारण.

प्रभाग १८ – १८ अ नागरीकांचा मागास प्रवर्ग, १८ ब सर्वसाधारण महिला, १८ क सर्वसाधारण महिला, १८ ड सर्वसाधारण.

प्रभाग १९ – १९ अ नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, १९ ब नागरीकांचा मागास प्रवर्ग, १९ क सर्वसाधारण महिला, १९ ड सर्वसाधारण.

प्रभाग २० – २० अ नागरीकांचा मागास प्रवर्ग, २० ब सर्वसाधारण महिला, २० क सर्वसाधारण महिला, २० ड सर्वसाधारण.

प्रभाग २१ – २१ अ अनुसूचित जाती महिला, २१ ब नागरीकांचा मागास प्रवर्ग, २१ क सर्वसाधारण महिला, २१ ड सर्वसाधारण.

प्रभाग २२ – २२ अ अनुसूचित जाती, २२ ब नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, २२ क सर्वसाधारण महिला, २२ ड सर्वसाधारण.

प्रभाग २३ – २३ अ अनुसूचित जाती, २३ ब नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, २३ क सर्वसाधारण महिला, २३ ड सर्वसाधारण.

प्रभाग २४- २४ अ अनुसूचित जाती, २४ व अनुसूचित जमाती महिला, २४ क नागरीकांचा मागास प्रवर्ग, २४ ड सर्वसाधारण महिला.

प्रभाग २५ – २५ अ अनुसूचित जाती महिला, २५ ब नागरीकांचा मागास प्रवर्ग, २५ क सर्वसाधारण महिला,

प्रभाग २६ – २६ अ अनुसूचित जाती महिला, २६ ब अनुसूचित जमाती, २६ क सर्वसाधारण

Reactions

Post a Comment

0 Comments