राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी जाहीर; प्रदेश चिटणीसपदी आनंद मुस्तारे
सोलापूर (कटूसत्य वृत्त) - महापालिका प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून संघटन बळकटीकरणाच्या हालचालींना वेग आला आहे. पक्षाच्या विकासकामांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आला. त्याच पार्श्वभूमीवर विविध सेलचे पदाधिकारी जाहीर करण्यात आले.
या कार्यक्रमात नूतन पदाधिकाऱ्यांना शहराध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लिगल सेलच्या शहराध्यक्षपदी अॅड. जयप्रकाश भंडारे, कार्याध्यक्षपदी अॅड. दादासाहेब जाधव, सेक्रेटरी अॅड. राजेंद्र चव्हाण, खजिनदार अॅड. आदिनाथ चटके पाटील, तर उपाध्यक्षपदी अॅड. अविनाश कडलासकर यांची निवड करण्यात आली.
महिला पदाधिकाऱ्यांमध्ये अॅड. अरुणा घोडके, अॅड. संतोषी गुंडे पाटील, अॅड. माधुरी पाटील आणि अॅड. वंदना जाधव यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच अॅड. करण भोसले, अॅड. बाबुशा साळुंखे, अॅड. नवनाथ चटके, अॅड. राजकुमार पाटील आणि अॅड. जितेंद्र मोरे यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या.
दरम्यान, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चिटणीसपदी सोलापूर परिवहन समितीचे माजी सभापती आनंद मुस्तारे यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेश कोषाध्यक्ष तथा सरचिटणीस आ. शिवाजीराव गर्जे यांच्या हस्ते मुस्तारे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या नियुक्त्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ची शहरातील संघटनात्मक ताकद अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
.png)
0 Comments