प्रभाग दहा मधील भाजपच्या निवडणूकपूर्व प्रचाराच्या झंझावातात माने परिवार ठरतोय अग्रेसर
ज्येष्ठ भाजप नेते तथा मार्गदर्शक राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली मेजर तानाजी माने यांची नगरपरिषदेला होणार दमदार एंट्री
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- प्रभाग क्रमांक दहा मधील निवडणुकीला आता चांगलाच रंग भरताना दिसत आहे. या प्रभागातून सर्वसाधारण खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवत असलेले भारतीय जनता पक्षाचे संभाव्य उमेदवार मेजर तानाजी माने आणि त्यांच्या समर्थकांनी या प्रभागातील अक्षरशः प्रत्येक घरनं घर पिंजून काढायला प्रारंभ केल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते राजन पाटील, लोकनेते कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील, युवा नेते अजिंक्यराणा पाटील यांच्या विशेष प्रभाव आणि संपर्क क्षेत्रात या प्रभागाचा समावेश होत असल्यामुळे राजन पाटील यांच्याच मार्गदर्शनाखाली मेजर तानाजी माने आणि त्यांची सुपुत्र डॉ. किरण माने हे निवडणुकीची मतदानपूर्व रणनीती आखताना दिसत आहेत.
प्रभागाचे यापूर्वीचे नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाचे शहरातील लोकप्रिय युवा नेते सुशील भैय्या क्षीरसागर हे देखील माने परिवाराच्या जनसंपर्क मोहिमेला मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे या प्रभागात सर्वात जास्त प्रतिसाद हा निश्चितपणे माने परिवाराला आणि त्यांच्या परिवारातील सदस्य असलेले मेजर तानाजी माने यांच्यात उमेदवारीला मिळणार असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
मेजर तानाजी माने यांचे सुपुत्र आणि या प्रभागातील लोकप्रिय युवा नेते डॉ. किरण माने यांच्या माध्यमातून विविध उद्योगाच्या माध्यमातून सर्वसामान्य मतदारबांधव आणि शेतकरी दूध उत्पादक बांधवांशी या परिवाराचा सातत्याने नित्याचा संपर्क आहे.त्यामुळे या निवडणुकीतील वातावरण निर्मिती करण्यासाठी त्यांना या जनसंपर्काचा मोठा फायदा होताना दिसत आहे. तसेच प्रभाग दहाच्या विजयाची जबाबदारी असलेले ज्येष्ठ नेते राजन पाटील यांचे विश्वासू समर्थक असलेले युवा उद्योजक महादेव पासले तसेच भारतीय जनता पक्षाचे युवा नेते प्रशांत गाढवे यांनी देखील प्रभागातील जनसंपर्काच्या वातावरण निर्मितीला मोठा हातभार लावला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे प्रभाग दहा मधील पारडे दिवसेंदिवस जड होताना दिसत आहे.
वडिलांच्या प्रचारार्थ माने परिवाराचे सुपुत्र डॉ.किरण माने यांची अत्यंत चाणाक्ष रणणीती...
डॉ. किरण माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रभागातील निवडणुकीच्या सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटीचा एक सूचीबद्ध आणि शिस्तबद्ध कार्यक्रम आखल्यामुळे या प्रभागातील निवडणुकीची त्यांची जवळपास दुसरी प्रचार फेरी आता पूर्ण होत आली आहे.या शिवाय त्यांनी प्रत्येक समाज बांधवांच्या समूह संपर्कात राहून त्यांनी त्यांच्या विविध अडीअडचणी अत्यंत पोटतिडकीने जाणून घेण्यास प्रारंभ केला आहे. शिवाय माने परिवाराला आणि त्यांच्या समर्थकांना आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यामुळे प्रत्येक घटकातील समाजबांधव माने परिवाराला भेटून आपल्या अडीअडचणी सांगत प्रभागातील विविध विकास कामाबाबतही विविध मुद्दे आणि सूचना अत्यंत आत्मविश्वासाने मांडताना दिसत आहेत.

0 Comments